

चौंडी येथे आ. राम शिंदे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ कीटचे वाटप सुरु
सोमवार पासून जामखेड तालुक्यात होणार ‘आनंदाचा शिधा’ कीटचे वाटप
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट शासनाच्या अन्न व नागरी पुरावठा विभागामार्फत अन्नासुरक्षा योजनेमधील आणी अंत्योदय योजनेमधील लाभार्थी यांना दिवाळीनिमित्त ,”आनंदाचा शिधा” वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील 178200 लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


त्यांतर्गत प्रत्येक कुटुंबाला 1 किलो रवा, 1 किलो साखर,1 किलो चणाडाळ ,1 किलो पामतेल असे किट 100 रुपयात वाटप करण्यात येणार आहे. जामखेड तालुक्यात अन्नासुरक्षा योजनेतील 25446 कार्ड धारक आणी अंत्योदय योजनेतील 5556 कार्ड धारक असे एकूण 31002 कार्ड धारक असून त्यांतर्गत एकूण 178200 लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जामखेड तालुक्याला सर्व दिवाळी शिधा संच प्राप्त झाले असून आजपासून स्वस्त धान्य दुकानामधून वाटप करण्यास सुरवात झाली आहे. दिवाळी शिधा वाटप आज मौजे चौंडी येथील स्वस्त धान्य दुकानातून माननीय आमदार राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी लाभधारक उपस्थित होते.
शासनाकडून दिवाळीसाठी गोरगरीब लोकांसाठी दिलेल्या दिवाळी शिधाबाबत लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले.

“आनंदाचा शिधा’ कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व पामतेल वाटप केले जाणार आहे. जामखेड तालुक्यात एकूण 103 दुकाने असून नियोजनपूर्वक आराखडा तयार करून 2 दिवसात हे वाटप पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसील प्रशासमार्फत केले आहे.






