मध्यप्रदेश मध्ये दिवाळीसाठी गावी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील वाशिम मध्ये देखील ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटी

भोपाळ, २२ ऑक्टोबर : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मध्य प्रदेशमध्ये अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रिवा इथं भीषण अपघात एकामागून एक तीन वाहनांची धडक झाली.

बस आणि ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात ४० हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील रिवा इथं हा अपघात घडला आहे.

ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातात १२ जणांचा जागीच तर २ जणांचा उपचारदरम्यान अशा एकुण १४ जणांचा या आपघात मृत्यू झाला आहे. दिवाळसणानिमित्त सिकंदराबाद इथून प्रवासी लखनऊला त्यांच्या घरी जात होते.

दरम्यान बस रिवाच्या सोहागी डोंगरावर पोहोचली, त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रित सुटल्यानं ती ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातात ४० जण जखमी झाले आहे जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक न लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. अनेक प्रवाशी हे बसमध्ये अडकले आहे. या अपघातात अडकलेल्या प्रवाशांचे हात आणि पाय अक्षरश: तुटले असल्याची माहिती समोर आले आहे. जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बस आणि ट्रक उभ्या आहेत. पण, अपघातात तिसरे वाहन हे घटनास्थळावरून फरार झाले आहे.

महाराष्ट्रातील वाशिममध्येही मोठी दुर्घटना; ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटी

महाराष्ट्रातील वाशिम या ठीकाणी नागपूरवरून परभणीला जाणाऱ्या भरधाव शब्रिज ट्रॅव्हल्सच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात झाला आहे. चौकात बस पलटी झाल्याने बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. गाडी मध्ये ४० हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप समोर आलं नाही. या अपघातानंतर पोलिसांनी गाडीच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here