

कच्चा पुल पुन्हा गेला वाहुन, जामखेड श्रीगोंदा वहातूक तिसर्यांदा पडली बंद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीला आज सकाळी पुर आल्याने पुन्हा कच्चा पुल वाहुन गेला आहे .त्यामुळे जामखेड श्रीगोंदा रस्त्यावरील वाहतुक तिसर्यांदा बंद झाला आहे. त्यामुळे पुन्हा ग्रामस्थांनी कुसडगाव फक्राबाद धानोरा या रस्त्याचा वापर करावा असे आवाहन
पाटोदा येथील मा. सरपंच गफ्फार भाई पठाण यांनी केले .


याबाबत समजलेली माहिती अशी की सध्या जामखेड ते श्रीगोंदा या नॅशनल हायवेच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पाटोदा गरडाचे याठिकाणी आसलेल्या भवरवाडी नदिवर देखील पहीला जुना पुल पाडुन त्या ठिकाणी मोठा पुल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या याच नदीवर बाजुला सिमेंट च्या नळ्या टाकुन तात्पुरता कच्चा पुल तयार केला आहे.

सध्या या वर्षी परतीचा पाऊस पाठ सोडायला तयार नाही त्यामुळे पाटोदा येथील भवर नदीला मोठ्या प्रमाणात पुर येतो. त्यामुळे या ठिकाणी असलेला कच्चा पुल सारखा वाहुन जातो. अत्तापर्यंन्त तीन वेळा या जामखेड श्रीगोंदा रस्त्यावरील पुल वाहुन गेला आहे. वारंवार तयार करण्यात आलेला पुल वाहुन गेल्याने या ठीकाणी चांगल्या दर्जाचा पुल तयार करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांन कडुन करण्यात येत आहे. सध्या आज दि २१ रोजी सकाळी याठिकणचा पुल वाहुन गेल्याने जामखेड-श्रीगोंदा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.

तसेच पाटोदा गावानजीक भवर नदीला पाणी आल्यामुळे पाटोदा जामखेड रस्ता तिसर्यांदा बंद झाला आहे. नदीला पाणी असल्याने कोणीही नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. सध्या जामखेड जाण्यासाठी पाटोदा – खामगाव- फक्राबाद – कुसडगाव जामखेड या मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पाटोदा येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी केले आहे.






