
दिवाळी निमित्त गांधी एस एस कोचिंग क्लासेस जामखेड मध्ये बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
लहान मुलांन मध्ये एकाग्रता व कल्पनात्मक शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने जामखेड येथे दिवाळी 2022 निमित्त रविवार दि 23 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये 15 दिवसीय बुद्धीबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ पंच व प्रशिक्षक सागर गांधी द्वारे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवार दि 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता गांधी एस एस कोचिंग क्लासेस जामखेड येथे करण्यात येणार आहे. या शिबिराचे प्रवेश शुल्क माफक ठेवून एकूण 15 विशेष मुद्द्यांचा अभ्यास नियोजनपूर्वक घेण्यात येणार आहे.

लहान मुलांनी सतत बुद्धिबळ खेळल्यामुळे गणितीय क्रिया करण्यामध्ये व तर्क लावण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा होते. कल्पनात्मक शक्ती वाढते. बुद्धिबळ फक्त पूर्ण एकाग्रतेला महत्त्व देते. बुद्धिबळ मध्ये ग्रँड मास्टर लेव्हलचे खेळाडू पुढच्या 30 चाली पर्यंत हिशोब लावतात आणि समजा 31 व्या चालीला तो विचलित झाला किंवा त्यांचा तर्क चुकला की खेळ हरला म्हणून समजा आपल्या आयुष्यात आपण सुद्धा एकाग्र असणे किंवा आपले लक्ष केंद्रित असणे महत्त्वाचे असते.

बुद्धिबळ खेळत असताना तुम्ही सतत एकाग्र होऊन विचार करत असता तशीच एकाग्र होऊन विचार करण्याची सवय आपल्या मेंदूला लागावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही बुद्धिबळ सतत खेळत असाल तर तुम्हाला एक अनुभव नक्कीच आला असेल की तुम्ही जिंकणारा खेळ तुम्ही अगदी थोडक्यात हारता. कारण तुमच्याकडे संयम नसतो आणि जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत खेळण्याची हिंमत नसते म्हणजेच खिलाडूवृत्ती नसते त्यामुळे आपण हारतो. गोष्टी अर्ध्यावरच सोडून न देता त्या पूर्ण करणे म्हणजेच खिलाडूवृत्ती. यालाच इंग्रजीमध्ये “नेव्हर गिव्ह अप एटीट्यूड” असे म्हणतात. जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते.

जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेऊन दीपावली उत्सवाचा आनंद बुद्धीबळ कौशल्य आत्मसात करून द्विगुणीत करण्याचे आवाहन आयोजक शिक्षिका सौ नीतू गांधी व प्रा. सागर गांधी यांनी केले आहे. तसेच सर्वाना दिवाळी हा सण आनंदाचा व उत्साहाचा जावो ही शुभ कामना त्यांनी व्यक्त केली. शिबिरात सहभाग घेण्याकरिता नाव नोंदणी करण्याकरिता सर्व पालक व स्पर्धक यांनी प्रा सागर गांधी 9028026945 व शिक्षिका सौ नीतू गांधी 9579808111 यांच्याशी संपर्क साधावा नोंद घ्यावी. शिबिरात सहभागी होण्यासाठी मुलांनी वेळेवर यावयाचे आहे.






