

दिघोळ येथे मुलाच्या अंगावर वीज पडल्याने जखमी, दिघोळ परीसरात विजांच्या कडकडाट सह झाला जोरदार पाऊस
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील दिघोळ याठिकाणी आई वडीलांन सोबत शेतात काम करत असताना मुलाच्या अचानक अंगावर वीज पडुन तो या घटनेत जखमी झाला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने जामखेड येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली तसेच आज दिघोळ परीसरात विजांच्या कडकडाट सह जोरदार पाऊस झाला.

गेल्या महीन्यांपासून जामखेड तालुक्यातील परतीचा पाऊस काही पाठ सोडायला तयार नाही. आज २० ॲक्टोबर रोजी दुपारी दिघोळ परीसरात विजांच्या कडकडाट सह तब्बल एक तास ते दिड तास जोरदार पाऊस पडला. याच वेळी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दिघोळ येथील खर्डा रोडवरील एका टेकडीवर विकास राजेंद्र आटकरे वय १८ रा. दिघोळ, ता जामखेड हा आपल्या आई वडील व चुलत भावा सोबत शेतातील कामाला मदत करत होता. या वेळी दिघोळ परीसरात विजांच्या कडकडाट सह जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे विकास आटकरे हा शेतातील एका चिंचेच्या झाडाखाली जाऊन थांबला होता. मात्र अचानक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली त्यामुळे तो या घटनेत त्याच्या पाठीला व पायावर जखख झाली.


घटनेची माहिती समजताच गावातील पै. सुरज रसाळ, नागनाथ उमाप, वसंत रसाळ, बीबीशन पारखे, शिवाजी अटकरे, सचिन आटकरे, महेश आटकरे, राजेंद्र अटकरे यांच्या सह अनेक युवकांनी धाव घेत जखमी विकास यास एका वाहनाने जामखेड येथिल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. विकास आटकरे हा इयत्ता अकरावी मध्ये शिकत आहे. त्याच्या खिशात मोबाईल आसल्याने त्याच्या अंगावर वीज पडली आसल्याची चर्चा ग्रामस्थांन मध्ये आहे. त्याच्या कडील मोबाईल देखील वीज पडल्याने जळाला आहे. या नंतर तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कुंडलिक आवचरे यांनी उपचार केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सध्या आनखी काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने पावसाळ्यात शेतात काम करत असताना शक्यतो मोबाईल घरीच ठेवावा तसेच तातडीने आपले चालु काम सोडून झाडाखाली न थांबता मोठ्या निवाऱ्याच्या ठिकाणी थांबण्याचे अवहान तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.







