नान्नज येथुन दहावीचा विद्यार्थ्याचे अपहरण, पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील नान्नज जवळील चोभेवाडी येथील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थीचे नान्नज येथिल शाळेसमोरुन अपहरण झाले आहे. या प्रकरणी मुलाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन कल्याण कुमटकर ( इ १०वी )रा चोभेवाडी ता .जामखेड जि अहमदनगर आसे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थी हा नान्नज येथिल नंदादेवी विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि १८ ॲक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता रोहन कुमटकर हा नान्नज येथिल नंदादेवी विद्यालय नेहमी प्रमाणे शाळेत गेला होता. मात्र संध्याकाळ झाली असली तरी तो परत आला नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी रोहनचा आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र अद्याप तो मिळुन आला नाही. त्यामुळे सदर मुलाचे वडील कल्याण नामदेव कुमटकर यांनी आज दि १९ ॲक्टोबर रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर विद्यार्थी कोणाच्या निदर्शणास आल्यास जामखेड पोलीस स्टेशन अथवा 9767567187 व 9699848180 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांन कडुन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here