नान्नज येथुन दहावीचा विद्यार्थी बेपत्ता ;आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील नान्नज जवळील चोभेवाडी येथील इयत्ता १० मध्ये शिकत असलेला विद्यार्थी नान्नज मधुन बेपत्ता झाला आहे. या बाबत कोणास आढळून आल्यास जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रोहन कल्याण कुमटकर ( इ १०वी )रा चोभेवाडी ता .जामखेड जि अहमदनगर आसे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि १८ ॲक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता रोहन कुमटकर हा नान्नज येथिल नंदादेवी विद्यालय नेहमी प्रमाणे शाळेत गेला होता. मात्र संध्याकाळ झाली असली तरी तो परत आला नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी रोहनचा आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र अद्याप तो मिळुन आला नाही. रोहन हा नान्नज या ठीकाणाहुन बेपत्ता झाला आहे. सदर विद्यार्थी कोणाच्या निदर्शणास आल्यास जामखेड पोलीस स्टेशन अथवा 97675671879699848180 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांन कडुन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here