२४ वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे मोठ्या मताधिक्याने विजयी

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. शशी थरूर यांनी आपला पराभव मान्य केला असून, त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले आहे.

बऱ्याच वर्षांनंतर अखेर काँग्रेसला नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे.

आज झालेल्या मतमोजणीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांना तब्बल ७ हजार ८९७ मते मिळाली. तर विरोधी उमेदवार शशी थरूर यांना १ हजार ७८ मतांवर समाधान मानावे लागले. खर्गे यांना थरूर यांच्यापेक्षा आठ पट अधिक मते मिळाली आहेत. शशी थरूर यांनी आपला पराभव मान्य केला असून, त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, शशी थरुर यांनी ट्विट करुन नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदनही केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष होणे हा मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे यांना त्या कार्यात पूर्ण यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. एक हजाराहून अधिक मित्रपक्षांचा पाठिंबा मिळणे, आणि भारतभरातील काँग्रेसच्या अनेक हितचिंतकांच्या आशा आणि आकांक्षा पुढे नेणे हा एक बहुमान होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here