शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे – तहसीलदार योगेश चंद्रे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात परतीच्या पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्याने अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील सर्व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसल्याने उद्या पासून तातडीने तलाठी, कृषी सहाय्यक आणी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आवाहन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

या वर्षी परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत. यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती.

पण, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील उडीद व स्वायबीन पिके शेतातच आहेत. तर काही रब्बी हंगामातील ज्वारी व कांदा ही कवळी पीके पाण्यातच आहेत. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. त्यातच खरीप व रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.

याच अनुशंगाने जामखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.त्याचे पंचनामे उद्यापासून सुरु होणार आहेत. जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी बोलताना सांगितले की सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की आपण आपले गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक आणी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे.पंचनामे करत असताना आपली पिक पाहणीची नोंदही लगेच करून घ्यावी जेणेकरून अनुदान देणेकामी अडचण होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here