विकास कामांना खोडा घालत तर बघा, दिवाळी होऊन द्या रस्त्यावर उतरुन आंदोलने छेडू

आ. रोहित पवार यांनी दिला शिंदे सरकारला इशारा

जामखेड प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथिल ७ कोटींची विकासकामे रद्द केली. शहरातील देखील कोट्यवधी रुपयांची कामे रद्द केली. तालुक्यात सध्या सुरू असलेल्या व मंजुर आसलेल्या विकास कामांना देखील आडकाठी आणण्याचे काम शिंदे सरकार व विरोधक करत आहेत. मात्र जनता दुधखुळी राहीलेली नाही जनतेला सर्व माहिती आहे. त्यामुळे जर मतदारसंघातील विकास कामांना खोडा घातला तर दिवाळी नंतर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल असा
इशारा आ. रोहित पवार यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

दिपावली सण उत्सवानिमित्त आज दि १८ रोजी सकाळी जामखेड शहरात आ. रोहित पवार यांनी नुकतेच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत सावता महाराजांचे सातरावे वंशज ह. भ. प. रमेश (महाराज) वसेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती राजश्रीताई सुर्यकांत मोरे, माजी सभापती संजय वराट, शरद शिंदे, राजेंद्र पवार, हनुमंत पाटील, पवनराजे राळेभात, अमित जाधव, विश्वनाथ राऊत, बाप्पु शिंदे, चौंडी चे सरपंच सुनिल उबाळे, सतिश चव्हाण,प्रशांत शिंदे, अमोल गिरमे, प्रकाश काळे, प्रविण उगले, इस्माईल सय्यद, उमर कुरेशी, मोहन पवार, त्रिंबक कुमटकर, डॉ अविनाश पवार, जुबेर शेख, गणेश हागवणे, गणेश चव्हाण, सागर कोल्हे, वैजीनाथ पोले, प्रशांत हीरवे, काकासाहेब कोल्हे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की आम्ही स्वतःच्या हीमतीवर मंजुर करुन आणलेल्या विकास कामांचे भुमीपुजन करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र नागरिकांना सर्व माहित आहे की तालुक्यातील विकास कामे कशा प्रकारे होत आहेत. नान्नज या ठीकाणी आम्ही आलेल्या नीधीच्या विकास कामांचा बोर्ड पाडला आसे खालच्या पातळीवरचे राजकारण करु नका. बोर्ड काढुन विकास कामे रोखता येणार नाहीत. आपल्या कार्यकर्त्यांनी तो बोर्ड लगेच उभा करावा. विकासकामे करत आसताना त्रास देऊ नका त्याला उत्तर देखील आमचे पदाधिकारी जशास तसे देतील.

जवळा येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत १९.६६ कोटींच्या नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता आम्ही आणली आहे. प्रत्येक गावात विकास कामे मंजुर आहेत. जर का कोणी म्हणत असेल की ही कामे आम्ही मंजूर करून आणली आहेत तर माझे त्यांना अवहान आहे समोरासमोर या म्हणजे खरे काय व खोटे काय समजेल. कामे मंजुर करत आसताना आपले महाशय सांगतात त्यांची विकास कामांना स्थगिती द्या व माझ्या नावाने मंजुर कामे मंजूर दाखवा पण जनता दुधखुळी नाही असा टोला आ. राम शिंदे यांचे नाव न घेता आ. रोहित पवार पवार यांनी त्यांना लावला. कर्जत जामखेड सह महाराष्ट्रमध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झाली आहे त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आवाहन देखील त्यांनी सरकारला केले आहे.

या नंतर हभप रमेश महाराज वसेकर यांनी आशिर्वाद पर दोन शब्द बोलताना सांगितले की आ. रोहित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील आणि माझा आदर्शवाद देखील खरा ठरतो. या नंतर प्रा. मधुकर राळेभात बोलताना सांगितले की कायमस्वरूपी मतदारसंघातै एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ते व नागरीकांसाठी मेळावा आयोजित करण्यात यावा त्यामुळे लोकांची नाळ आणखी वाढेल. वीस वर्षांत कधी एवढी विकास कामे झाली नाहीत ती आज कामे सुरू आहेत. आ. रोहित पवार यांच्या मुळेच कर्जत जामखेड ची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे.

जामखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकर्‍यांना अनुदान मिळाले पाहिजे. मुस्लिम समाज्यासाठी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. पदवीधर मतदारसंघात नावनोंदणी करुन आपला आमदार निवडून द्यायचा आहे असे देखिल अवहान केले.

दत्तात्रय वारे यांनी यांनी नान्नज येथिल विकास कामांचा बोर्ड पळवल्याच्या विषयावर बोलताना सांगितले की विकिस कामांचे लावलेले बोर्ड पळवले तरी विकास कामे पळवु शकत नाही. गेल्या आडीच वर्षात आ. रोहित पवार यांनी विकासाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. कारण कुठल्याही गावात गेले तर आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून विकास कामे दिसत आहेत. विरोधक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कीती ही आदळ आपट केली तरी केलेली विकास कामे पुसू शकत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here