जवळयाचा सुपुत्र पै.रोहित आव्हाड ठरला माण अभिमान केसरीचा मानकरी.

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील जवळा येथील सुपुत्र पैलवान रोहित आव्हाड हा यावर्षीचा ‘ माण अभिमान केसरी ‘ ठरला असून, त्याने मानाची चांदीची गदा मिळवली आहे.

सातारा जिल्ह्यातील माण अभिमान केसरी कुस्ती मैदान कुस्ती शौकीनांसाठी प्रतिष्ठेचे समजले जाते. कोजागिरी उत्सवानिमित्त माण तालुक्यातील पिसाळवाडी येथे कुस्ती मैदान भरवण्यात आले होते. याठिकाणी प्रतिष्ठेची कुस्ती जिंकत पैलवान रोहित याने चांदीची गदा आणि मान अभिमान केसरी किताब पटकावला.

पैलवान रोहित आव्हाड हा गेली वर्षापासून कोल्हापुर येथे गंगावेश तालमीत सराव करत आहे.यापुर्वी जवळा येथील शिवगर्जना तालिमीत रोहित याने सराव केला.

जवळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय आव्हाड यांचे यांचे चिरंजीव असलेल्या पैलवान रोहित याने प्रतिकुल परिस्थितीत शरीर कमवत कुस्तीमध्ये नाव कमावले आहे.

या यशाबद्दल पैलवान रोहित आव्हाड याचे आ.प्रा.राम शिंदे, आ.रोहित पवार, ज्योती क्रांती मल्टीटेटचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, माजी उपसभापती दिपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे,माजी सरपंच प्रदिप दळवी, जवळा सेवा संस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील, संतराम सूळ , प्रशांत पाटील , बाबा महारनवर, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर,राहूल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here