ट्रॉफीक पोलिसांनी गाडी पकडताचं तरुणाचं रस्त्यावर झोपुन अभ्यास करत केले अनोखे आंदोलन

आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे पुणे पोलिसांची उडाली धावपळ

पुणे : वाहतूक पोलिसांच्या नावाने पुणेकर अन् एकूणच पोलीस दलात बोंबाबोंब सुरू असताना आज स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने वाहतूक पोलिसांच्या निषेधार्थ थेट अलका चौकातील केळकर रस्त्याच्या कडेला झोपून आगळे-वेगळे आंदोलन केले. फक्त आंदोलनच नाही तर त्याने झोपून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास देखील सुरू केला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी तर झालीचं होती पण, पोलिसांची एकच धावपळ उडाली आणि पुण्यात खळबळही उडाली.

 

राहूल धांडे (वय २७, रा. सेना दत्त पोलिस चौकीजवळ, मुळ. यवतमाळ) असे निषेध करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे. त्याच झाल असं, संबंधित तरूण मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून तो शिक्षण घेतले आहे. तो सध्या पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहे. गेल्या चार ते साडे चार महिन्यांपासून गावी गेलेला नाही. त्याचे आई-वडिल शेतकरी आहेत. दिवाळीनिमित्त तो गावी जाण्यासाठी आज निघाला होता. त्याने ट्रेनचे बुकींग देखील केले होते. सव्वा तीनच्या सुमारास त्याची ट्रेन होती. त्यासाठी तो मित्राला सोडविण्यासाठी घेऊन दुचाकीवरून अलका चौकातून पुणे स्टेशनकडे जात होता.

परंतु, अलका चौकातून झेड ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच वाहतूक पोलीस वाहने अडवून आपला दंड वसूली कार्यक्रम चालू ठेवतात. नेहमीप्रमाणेच आजही ते तिथेच होते. तरुणाने सिग्नल जंप केल्यावरून त्याला पोलीसांनी अडविले. त्याच्या गाडीवर दंडाची पाहणी केली. तर, त्या गाडीवर २०१९ पासूनचा दंड पेडिंग होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. पण, तरुणांनी त्यांना आमच्याकडे पैसे नाहीत. आम्हाला गावी जायचे आहे. आम्हाला जाऊ द्या. दंड नंतर भरू असे सांगितले. त्यांना ट्रेन आहे, ती निघून जाईल असेही सांगितले. पण, पोलीस काही ऐकत नव्हते. त्यांनी या तरुणांना थांबवून ठेवले. या तरुणांसारखेच इतर वाहने देखील पकडण्यात आली होती. यातील दोन वाहने मात्र, पोलिसांनी बाजूला नेहून सोडून देण्यात आल्याचा आरोपी या तरुणाने आंदोलन करताना जाहिररित्या केला.

पैसे घेऊन त्यांनी वाहने सोडली. पण, आम्हाला सोडले नाही. वाहतूक पोलिसांनी न सोडल्याने राहूलची ट्रेन मिस झाली. त्याला वेळत पोहचता आले नाही. त्याचे त्याला दुख: झाले. त्यानंतर त्याने पोलिसांचा निषेध म्हणून थेट अलका चौकातील कुमठेकर रस्त्याच्या मध्येच झोपला आणि आपला निषेध नोंदवला. काही क्षणात त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी मोठी गर्दी केली. तोपर्यंत वाहतूकही रेंगाळली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. पण, तोपर्यंत या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला अर्धा तास झाला होता. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही समजेना. कसबस त्याला पंधरा मिनिटे समजावून सांगितल्यानंतर त्याचे मन परिवर्तन करण्यात यश आले.

वाहतूक पोलिसांनीच पुन्हा त्याला रिक्षा करून पुणे स्टेशनपर्यंत पोहचवले. त्याची ट्रेन मात्र मिस झाली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस दलात उलट- सुलट चर्चांना उधान आले आहे. वाहतूकीचा बोजवारा उडालेला असताना वाहतूक पोलीस चौकात थांबण्याऐवजी कडेला थांबून कारवाईतचं मग्न असल्याचे चित्र दिवसभरातून काही काळ तरी पाहिला मिळत आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर देखील पोलीस त्याला गांर्भियाने घेत नसल्याचे दिसत आहे.

मग ही गाडी सोडली कशी..!

राहूलच्या दुचाकीसोबतच एक कार (एमएच. आर.एल. १४४६) देखील वाहतूक पोलिसांनी अडवली होती. कारवर ९०० रुपये चलान होते. मात्र त्या कार चालकांची पोलिसात ओळख होती. त्यांनी उपस्थित ट्रॅफिक पोलिसांना ओळख दाखविली. तर त्यांना सोडून देण्यात आले, असे राहुलने माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here