खर्डा ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांच्या आत्महत्याने खर्डा शहरात खळबळ.

खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा?

जामखेड प्रतिनिधी

खर्डा ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय काळे यांनी आपल्या रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नसले तरी खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की खर्डा ग्रामपंचायतची माजी ग्रामपंचायत सदस्य संजय विष्णू काळे वय ५३ वर्ष यांनी आज दि १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात राहत्या घरी कोणीही नसताना आत्महत्या केल्याने खर्ड्यात एकच खळबळ उडाली आहे.

संजय काळे यांचे खर्डा शहरातील मेन रोड या ठीकाणी सलून चे दुकान आहे ते खर्डा ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते. काळे हे अतिशय मनमिळावू व शांत स्वभावाचे होते त्यांनी अनेक खाजगी सावकारांकडून पैसे घेतल्याचे समजते आहे? त्या सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे.
घटनास्थळी पोलिसांनी समक्ष भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के व पोलीस कॉन्स्टेबल खाडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here