

जामखेड जवळील सौताडा धबधबा खुनावतोय पर्यटकांना
धबधबा पावसाने वहातोय धो धो, पर्यटकांची गर्दी वाढली
जामखेड प्रतिनिधी
राज्यभरात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा व जामखेड जवळील सौताडा येथील विंचरणा नदीचा रामेश्वराच्या खोल दरीत पडणार धबधबा गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने धो धो वाहू लागला आहे. ऑक्टोबर महिनाच्या पासून सुरु झालेल्या पावसाने धबधब्याचे रौद्ररूप पर्यटकांना पहावयास मिळाले.

मराठवाड्याचा अर्धअधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा ,सिंदफना ,विंचरणा ,बिंदुसरा , डोमरी या नद्यांचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाळा संपत आला असताना पावसाने जोर धरला आहे
विंचरणा नदीच्या उगमापासून राज्यात प्रसिद्ध धबधबा असलेल्या जामखेड जवळील सौताडा येथील रामेश्वर पर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अंतरात या नदीवर सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव , भुरेवाडी , लांबरवाडी ,मुगगाव अशी तलावांची मालिका आहे उगमस्थानापासून सौताडा पर्यंत वरचे चार तलाव भरल्याशिवाय सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही व हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशियाय येथील प्रसिद्ध धबधबा सुरू होत नाही.

चालू वर्षी शेवटच्या टप्प्यात पाटोदा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरू झाला त्यातच मराठवाड्याचा मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला जामखेड पासुन दहा कीमी आसलेल्या सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा हा सध्या झालेल्या दिवसात झालेल्या पावसामुळे सध्या धो धो वाहात आहे. यामुळे येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालीत असुन हे सौंदर्य ‘ याची देही याची डोळा ‘ पाहण्यासाठी परतीच्या पावसाने पर्यटकांना खुणावणारा धबधबा यथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.


तालुक्यातील हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध व निसर्गरम्य आहे. सौताडा येथील रामेश्वर धबधबा, ! येथील लाभलेलं अप्रतिम निसर्गसौंदर्य . हजारो फूट उंचीवरून धीरगंभीर आवाज करीत खोल दरीत धो धो. कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे, परतीच्या दमदार पावसामुळे हा धबधबा पुन्हा सुरू झाला व पर्यटकांना आकषित करु लागला आहे.







