
गुरूकुल मंडळाच्या बहुसंख्य सभासदांचा गुरुमाऊली मंडळ तांबे गट आघाडीस बिनशर्त पाठिंबा
शिक्षक बँक निवडणुकीत तांबे गटाची ताकद वाढली, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली.
जामखेड प्रतिनिधी : १४ आॅक्टोबर
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली आहे तशा तशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. या निवडणुकीत गुरूकुल मंडळाचा उमेदवार असूनही जामखेड तालुक्यातील गुरूकुलचे आधारस्तंभ जेष्ठ नेते संतोष डमाळे यांनी गुरूकुल मंडळातील आपल्या बहुसंख्य सहकाऱ्यांसोबत गुरुमाऊली मंडळ २०१५ तांबे गट, शिक्षक एकल मंच व ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडी बिनशर्त पाठिंबा दिलाने शिक्षक बँक निवडणुकीत तांबे गटाची ताकद वाढली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
यावेळी गुरुमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचे व जिल्ह्याचे शिक्षक नेते अर्जुन शिरसाठ, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत बांगर, ज्येष्ठ नेते रा. का. बडे, संजय चव्हाण उच्च अधिकार समिती यांच्या उपस्थितीत शिक्षक समितीचे जामखेड तालुक्याचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मार्गदर्शक संतोष डमाळे, गुरुकुल मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राम ढवळे, गुरुकुल मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश पवार, सांस्कृतिक गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष नामदेव खलसे, शिक्षक समितीचे सरचिटणीस आजिनाथ पालवे, गुरुकुल सांस्कृतिक समितीचे सरचिटणीस विजय जेधे, गुरुकुल मंडळाचे कोषाध्यक्ष संतोष वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक बळीराम अवसरे, गुरुकुल डी सी पी एस तालुका अध्यक्ष नानासाहेब बांगर, श्री. विठ्ठल गंभीरे, लक्ष्मण वटाणे, मारुती फड, श्रीमती जगताप मॅडम, श्रीमती उनवणे मॅडम, श्रीमती डमाळे मॅडम या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच, मंडळ व शिक्षक भारती आघाडीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते श्री राम ढवळे यांनी बँकेच्या कारभार अतिशय उत्कृष्ट सुरू असून सभासद हित या आघाडीने जोपासले आहे. त्यामुळे आम्ही बिनशर्त जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत असे मत व्यक्त केले. यावेळी या सर्वांचे जिल्हा नेते माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक श्री अर्जुनराव शिरसाठ, ऐक्य मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णुपंत बांगर, ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक रा. का. बडे यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना अर्जुन राव शिरसाठ यांनी विद्यमान संचालक बॉडीने सभासदांना निर्णय घेऊन सभासदांचे हित जोपासले आहे. त्यामुळे सर्वसामान्य सभासद गुरुमाऊली मंडळ, शिक्षक एकलमंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भरती आघाडीकडे दिवसेंदिवस पाठिंबा देत आहे. जिल्हा नेते माननीय बापूसाहेब तांबे व राजकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्वसामान्य सभासदांच्या विचारातून बँकेचे कामकाज पाहिले जात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आपल्या काम धेनूचा विकास साधण्यासाठी व सर्वसामान्य सभासदांचे हीच जोपासण्यासाठी वेगवेगळ्या योजना सभासदांच्या योग्य सुचनेतून, आमसभेच्या माध्यमातुन राबविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली व गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीला प्रचंड मतांनी सभासदांनी छत्री फुलीवर शिक्का मारून विजयी करावे असे आवाहन केले.
दि. १२ आॅक्टोबर रोजी येथील कार्यालयात शिक्षक समितीचे माजी जामखेड तालुकाध्यक्ष व जेष्ठ मार्गदर्शक संतोष डमाळे, गुरुकुल मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राम ढवळे, कार्याध्यक्ष अविनाश पवार, कोषाध्यक्ष संतोष वाघ
सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष नामदेव खलसे, सरचिटणीस विजय जेधे, शिक्षक समितीचे सरचिटणीस आजिनाथ पालवे, ज्येष्ठ मार्गदर्शक बळीराम अवसरे, गुरुकुल डी सी पी एस तालुका अध्यक्ष नानासाहेब बांगर, विठ्ठल गंभीरे, लक्ष्मण वटाणे, मारुती फड, श्रीमती जगताप मॅडम, श्रीमती उनवणे मॅडम, श्रीमती डमाळे मॅडम या गुरूकुल मंडळातील सदस्यांनी गुरूमाऊली तांबे गटास बिनशर्त पाठिंबा दिला आहे.





