नदीला पुर आल्याने ग्रामस्थांनी कुसडगाव – फक्राबाद- धानोरा या मार्गाचा वापर करावा मा. सरपंच गफ्फार भाई पठाण

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीला पुर आल्याने कच्चा पुल वाहुन गेला आहे .त्यामुळे जामखेड श्रीगोंदा रस्त्यावरील वाहतुक बंद झाली आसल्याने .ग्रामस्थांनी कुसडगाव फक्राबाद धानोरा या रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पाटोदा येथील मा. सरपंच गफ्फार भाई पठाण यांनी केले .

मध्यरात्री पाटोदा येथील पुल वाहुन गेल्याने गफ्फारभाई पठाण यांच्या निदर्शनास ही गोष्ट लक्षात आली . त्यांनी तात्काळ दोन्ही बाजूंने युवकांना उभे करून वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविली व त्यांनी प्रशासनाला सतर्क केले त्यामुळे कुणताही अनुचित प्रकार घडला नाही.या वेळी कल्याण कवादे पाटील, भाऊसाहेब कवादे, मचींद्र लंगे, प्रकाश मोरे, खंडु राजे कवादे, मुकुंद आप्पा कडु, प्रकाश कडु, सोमनाथ टाफरे, जोगेंद्र थोरात, देवा मोरे, समीर पठाण, नवनाथ महारनवर, वैभव महारनवर, बाबासाहेब गरड, आसोक काटकर, नानामऊ गव्हाणे देखील घटस्थाळी आले होते. तसेच पाटोदा गावानजीक भवर नदीला पाणी आल्यामुळे पाटोदा जामखेड रस्ता बंद झाला आहे. नदीला पाणी असल्याने कोणीही नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. सध्या जामखेड जाण्यासाठी पाटोदा खामगाव फक्राबाद कुसडगाव जामखेड या मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पाटोदा येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here