गुरुमाऊली मंडळ 2015 व बापूसाहेब म्हणजे परिसस्पर्श- रामहरी बांगर ,सरचिटणीस प्रा.शिक्षक संघ जामखेड
जामखेड प्रतिनिधी
विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या शिक्षक बँक निवडणूक प्रचार फेरी दरम्यान रामहरी बांगर यांनी आपले विचार मांडले. गुरुमाऊली मंडळ 2015 ,शिक्षक भारती, एकल मंच ,ऐक्य युती चे उमेदवार श्री.संतोषकुमार किसनराव राऊत व विकास मंडळाचे उमेदवार श्री.मुकुंदराव सातपुते तसेच मंडळाचे सर्व उमेदवारांना जामखेड तालुक्यातून 300 चा टप्पा पार करून दाखवू हे प्रथम त्यांनी नमूद केले.

गुरुमाऊली मंडळ 2015 व बापूसाहेब म्हणजे शुद्ध सोन आहे. जिल्ह्यातील सभासदांनी आपले सोने करून घ्यावे.व ज्यांना गुरुमाऊलीचा स्पर्श नको आहे त्यांनी स्वतःचे काय होईल ते स्वतः ठरवावे. गुरुमाऊली मंडळ 2015 यांनी केलेला कारभार हाच मंडळाचा विजय आहे.हे आज विजयादशमी च्या दिवशी सांगत आहे.
मंडळाने घेतलेले आजपर्यंतचे निर्णय
शिक्षक बँकेने कर्ज मर्यादा ९ लाखावरून ३५ लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवली.
संचालकाला कर्जासाठी फोन न करता.. अखंडपणे कर्ज सुरू ठेवले.
कर्जाचा व्याजदर 11 टक्के वरून 8.70 % वर आणला.
शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज,वाहन कर्ज इत्यादी कर्ज सुरू केले.
कोवीड महामारीच्या काळात कोवीड कर्ज सुरू केले .
सर्व कर्जांना मयत निधीचे संरक्षण दिले.
लाभांश १ टक्क्यांवरून १०.१० टक्केपर्यंत दिला.
कायम ठेवीवरील व्याज ४ टक्क्यावरून ८.२५ टक्क्यांपर्यंत दिले.
मुदत ठेवीवरील व्याजदर व कर्जावरील व्याजदर यातील तफावत तीन टक्के पेक्षा जास्त असू नये …असा पोटनियम दुरुस्त केला.
स्टाफिंग पॅटर्न लागू करून कर्मचारी भरती केली नाही.
त्यामुळे मला या गुरुमाऊली मंडळाचा अभिमान वाटतो. तसेच या संचालकाच्या आदर्शवत कारभाराचा .अजून वेळ गेलेली नाही. तमाम सर्व जिल्ह्यातील सुज्ञ सभासदांनी विचार करून येत्या 16 तारखेला हाती घ्या छत्री, नाहीतर खिशाला बसेल कात्री.





