पवारांच्या कवितेवरील समीक्षा ग्रंथाने नगर जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे .-छत्रपती संभाजी राजे

जामखेड (प्रतिनिधी)

” पवारांची कविता मुंबई, नागपूर,नांदेड, अमरावती व कर्नाटक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात असल्याचे पाहून मला आनंद होत आहे.तसेच पवारांच्या कवितेवर प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समीक्षा ग्रंथाने जामखेडसह नगर
जिल्ह्याचे लौकिकात मोठी भर पडली आहे “असे गौरवोद्गार मा.खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज मा. खासदार छत्रपती संभाजी राजे खर्डा येथे आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमास जात असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड होते. यावेळी ढोल ताशाचे गजरात अवधूत पवार, संभाजी ढोले सह जामखेड शहरातील विविध कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर काळकुटे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष राहुल उगले, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश वारे, प्रशांत काका राळेभात, हाजी जावेद सय्यद, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष भरत देवकर, डॉ. सादिक पठाण, शिक्षक संघटनेचे नेते मल्हारी पारखे, प्रा.राम निकम, प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, संदीप बोराटे, प्रा. विजया नलवडे, बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, शिवराज घुमरे, देवीदास भादलकर, मुरुमकर साहेब आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रा विजया नलवडे यांनी संभाजी राजे यांच्या जीवनकार्याचा काव्यातून परिचय मांडला. उपस्थितांनी त्यास दाद दिली. यावेळी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी कवि आ.य.पवारांच्या निसर्ग विज्ञान कवितेवर लातूर येथील राष्ट्रीय चर्चासत्राने प्रसिद्ध केलेला समीक्षा ग्रंथ छत्रपती संभाजी राजे यांना भेट ‌दिला. संभाजी ढोले यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here