महिला शिवसैनिकांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप

नाशिक : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जात असलेल्या महिला शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला असून महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप दिला आहे. नाशिक मुंबई महामार्गावर हि घटना घडली असून यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसते आहे.


गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला दसरा मेळावा आज मुंबईत होत असून यासाठी राजभरातुन शिंदे समर्थक- ठाकरे समर्थक मुंबईला रवाना झाले आहेत. यंदाचा दसरा मेळावा सर्वांनाच लक्षात राहील असाच होत असून यासाठी दोन्ही गटांकडून गर्दी जमविण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे.

यासाठी खाजगी बसेससह महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आली आहेत. तत्याशिवाय रेल्वे तर काही कार्यकर्ते खाजगी वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावर महिला शिवसैनिक बसमधून जात असताना त्याच सुमारास शिंदे गटाचे काही कार्यकर्ते खाजगी वाहनाने जात होते. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना महिला शिवसैनिकांनी भर रस्त्यात चोप दिला आहे.

दरम्यान महिला कार्यकर्त्या या बसमधून मुंबईकडे जात होत्या. यावेळी कसारा घाटाच्या पुढे शहापूरच्या जवळपास हा राडा बघायला मिळाला. महिला शिवसैनिक बसमधून जात असताना बाजूने जाणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील हावभाव करत डिवचल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांनी गाडी थांबवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप दिला आहे. नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये जोरदार राडा झालेला बघायला मिळाला. याचा कारण ठरलंय ते म्हणजे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चालत्या वाहनांमधून अश्लील इशारे केल्याचा महिला शिवसैनिकांनी आरोप केला. त्यानंतर या महिला शिवसैनिकांनी आपली गाडी थांबवली आणि या कार्यकर्त्यांना चोप दिला.

नाशिक मुंबई महामार्गावरील घटना

नाशिक मुंबई महामार्गावरून जेव्हा ही महिलांची बस जात होती. त्याचवेळी जाणाऱ्या वाहनांमध्ये शिंदे कार्यकर्ते होते. त्यांनी महिलांकडे बघून काही चित्र विचित्र हातवारे केले. त्यामुळे महिलांनी ही गाडी थांबवण्यात आली आणि त्यानंतर या महिलांनी वाहनातील कार्यकर्त्याना बाहेर काढत जोरदार चोप दिला आहे. मात्र काही वेळातच काही शिवसैनिकांनी महिलांना थांबवत वाद मिटवण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच ते पुढील दिशेने मुंबईकडे रवाना झाले. मात्र दोन्ही वाहने कोणत्या जिल्ह्यातून आली आहेत, हे मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here