वचननाम्याची खात्री निवडून येणार छत्री

शिवश्री. नानासाहेब मोरे उपाध्यक्ष जामखेड तालुका प्राथ.शिक्षक संघ.

जामखेड प्रतिनिधी

गुरूमाऊली मंडळ 2015 तांबे गट 16 आक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत विक्रमी मताने निवडुण येणार आहे. प्रचारानिमित्त सभासदांच्या भेटीदरम्यान याची 100% खात्री येत आहे. इतर मंडळाचे वचननामे वाचले तर असे दिसून येते की, त्यांच्या वचननाम्यात सुद्धा प्रयत्न करणार असं आहे मग ज्यांच्या वचननाम्यातच पक्के वचन देण्याचा सुद्धा दम राहिलेला दिसून येत नाही त्यामुळे नक्कीच जामखेड तालुक्यातील इतर मंडळापेक्षा नक्कीच गुरुमाऊली मंडळ 2015 तांबे गट हा नक्कीच मोठ्या फरकाने आघाडी घेणार आहे.

आत्तापर्यंत गुरुमाऊली मंडळ 2015 ने( तांबे गट )जो वचननामा दिला तो त्यांनी पूर्ण करून दाखवलेला आहे परंतु जे आता वचन देत आहोत तेही पूर्ण करणारच.(कर्ज व्याजदर -7%करणार) कारभार 2% टक्के फरकाने करणार नाही तर तो आम्ही 1.70% फरकाने केला आहे. प्रत्येकाला स्वतःचे हित कळते. त्यामुळे वचननाम्याची खात्री आसल्याने निवडून छत्रीच येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here