कीराणा दुकानातीलच कामगाराने मारला खाद्य तेलांच्या डब्यावर डल्ला. ;जामखेड पोलिसांन कडून सर्व तेलाचे डबे मुळ मालकाकडे सुपूर्द

शहरातील तोडकरी कीराणा दुकानातील दोन कामगारांनी एका मित्राच्या मदतीने दुकानातील १ लाख ६९ हजार रुपयांचे ७७ खाद्य तेलाचे डबे लंपास केले होते. मात्र जामखेड पोलीसांनी या घटनेचा तपास करीत आरोपींचा शोध घेत सर्व खाद्य तेलाचे डबे फीर्यादी मुळ मालकाकडे सुपूर्द केले.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड शहरातील बस स्थानकासमोर तोडकरी कीराणा दुकान आहे. या दुकानात गेल्या तीन वर्षांपासून आरोपी लहू बाजीराव सांगळे रा. कर्‍हेवाडी ता. आष्टी व अलीम उर्फ आलम दादा शेख रा. नान्नज हे कामगार कामाला होते. मात्र दुकानात काम करत असताना तीसरा आरोपी मित्र सुरेश भगवान गंभीरे रा. सरदवाडी ता. जामखेड याच्या मदतीने दुकान मालकाची नजर चुकवत व गर्दीचा फायदा घेत गेल्या आनेक महीन्यांपासून सदर आरोपी हे तेलाचा एक एक डबा करुन लंपास करत होते.

याबाबत ची माहीती फिर्यादी दुकान मालक वसंत नंदकिशोर तोडकरी रा. खाडे नगर ता. जामखेड यांना दि १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ रोजी समजली व यातील दोन आरोपींवर पाळत ठेऊन तेलाचे डबे चोरी करताना दोघांना रंगेहात पकडले. यानंतर यातील दुकानात काम करत आसलेले आरोपी लहू बाजीराव सांगळे रा. कर्‍हेवाडी ता. आष्टी, अलीम उर्फ आलम दादा शेख रा. नान्नज व त्यांचा मित्र सुरेश भगवान गंभीरे रा. सरदवाडी ता. जामखेड या तिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला दि १ जुलै २०२२ जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत होते. पोलीस तपास करत असताना यातील वरील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडे कसुन तपास करीत असताना पोलिसांनी आरोपींन कडुन गुन्ह्यातील दुकानातील चोरीस गेलेले १ लाख ६९ हजार २७५ रुपयांचे जेमिनी सोयाबीन, जेमिनी सूर्यफूल, दीपसन सोयाबीन, पामोलीन अशा खाद्यतेलाच्या कंपनीचे ७७ खाद्य तेलाचे डब्यांचा तपास करुन हस्तगत केले. आरोपींना पोलिसांनी मागेच अटक करून न्यायालयात हजर केले होते त्या नंतर न्यायालयाकडु त्यांना जामीन मंजूर झाला होता.

तपासा दरम्यान हस्तगत केलेले होते सदरचे तेलाचे डबे आज दि ४ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फिर्यादी वसंत नंदकिशोर तोडकरी यांना परत करण्यात आले. पोलिसांनी सर्व चोरीस गेलेला माल फीर्यादी यांच्याकडे सुपूर्द केल्याने फिर्यादी यांच्याकडून जामखेड पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सो अहमदनगर ,अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर ,पोलीस उपअधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सो ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात ,पो हे कॉ संजय लाटे ,पो ना अविनाश ढेरे ,पो कॉ आबासाहेब आवारे,पो कॉ विजयकुमार कोळी, पो कॉ विजय सुपेकर, पो कॉ अरुण पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here