तालुक्यातील पिंपळवाडी येथे भरदिवसा झाली घरफोडी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी या ठीकाणी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील ६३ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांच ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी शिवाजी निवृत्ती नेमाने वय ६५ वर्ष, धंदा शेती राहणार, पिंपळवाडी ता.जामखेड यांच्या बंद घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि १ अॉक्टोबर रोजी दुपारी एक ते तीन वाजण्याच्या सुमारास कशाचे तरी साह्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व घरामध्ये असलेल्या कपाटा मधिल ५३ हजार ७५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये असा एकूण ६३ हजार ७५० रुपये कीमतीचा एवज भरदिवसा चोरट्यांनी चोरून नेला.

या प्रकरणी शिवाजी निवृत्ती नेमाने रा. पिंपळवाडी ता.जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय लाटे हे करत आहेत.

या पुर्वी देखील साकत परीसरातील कोल्हेवाडी व कडभनवाडी परीसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. दि ४ जुलै रोजी कडभनवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या श्री साकेश्वर महाराजांचा ४२ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. तर कोल्हेवाडी मध्ये देखील भरदिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांन कडुन होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here