

खर्डा गट वंचित व बहुजनांचा बालेकिल्ला म्हणून दुर्लक्ष – ॲड अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी दि.२९ सप्टेंबर रोजी
देशाला स्वातंत्र्य मिळवून नुकतीच ७५ वर्षे झाली. मात्र खर्डा परीसरातील सोनेगाव धनेगाव सह अनेक अनेक रस्त्यांचा वनवास संपला नाही. गेल्या ७५ वर्षांपासून गरिबाला राहायला घर नाही, इथल्या गरीब, कष्टकरी, शेतकऱ्याला गावात जायला रस्ता नाही. खर्डा गट वंचिताचा व बहुजनांचा बालेकिल्ला आहे. म्हणून या मतदारसंघा मध्ये जाणीवपूर्वक विकासाच्या कामासाठी अडथळा केला जातो.


खर्डा परिसरातील नागरिक व भटके- विमुक्त राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दि २९ सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना अॅड अरुण जाधव म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली. या ७५ वर्षांमध्ये गरिबाला राहायला घर नाही. इथल्या गरीब, कष्टकरी, शेतकऱ्याला गावात जायला रस्ता नाही. अजून ही सोनेगाव ते धनेगाव तसेच वाकी, लोणी शिकारे वस्ती, महानुवार वस्तीच्या रस्त्याचे काम होत नाही. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही.


जामखेड तालुक्यात २ आमदार १ खासदार आहेत. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे. की हा रस्ता करा या मागणीसाठी लहान मुलं-मुली शाळेमधले आले आहेत. इथल्या आमदार, खासदार यांना जनतेने निवडून दिले आहे. आमची सेवा करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी काही पुढारी सांगतात की आम्ही जनतेचे गडी आहोत. माझी त्या गड्यांना विनंती आहे. की शिकारे वस्ती, महानुवार वस्तीत जाऊन बघा जनतेचे काय हाल आहे. लेकरं शाळेत जाण्यासाठी रडतात. तुम्हाला अश्रूची किंमत आहे की नाही. शेतकऱ्याच्या, गरीबाच्या, कष्टकऱ्याच्या लेकरांची थोडी तरी जाणीव आहे का? तुम्ही निवडून जातात. निवडून गेल्यावर जनतेच्या प्रश्नाचा विसर पडतो.

हा खर्डा गट वंचिताचा व बहुजनांचा बालेकिल्ला आहे. म्हणून या मतदारसंघा मध्ये जाणीवपूर्वक विकासाच्या कामासाठी अडथळा केला जातो. हा माझा आरोप आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे. विकास कामात राजकारण केले नाही पाहिजे. जनता परेशान आहे. तुम्ही त्या प्रश्नावरती राजकारण करत आहे. धनेगाव ही (धाकटी पंढरी) आहे. या पंढरीत हजारो भाविक येतात. त्यांची या रस्त्यामुळे गैरसोय होती. हा रस्ता नाही झाला तर यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला.

यावेळी लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणले की हा रस्ता ४० वर्षापासून कच्चा आहे तो पक्का जलाच नाही. म्हणाले की हा रस्ता होणे खूप गरजेचे आहे. या रस्त्याने अनेक दिंड्या जातात तसेच शाळकरी मुलं-मुली या रस्त्याने शाळेत जातात. आम्ही संविधान दिंडी घेऊन धनेगाव (धाकटी पंढरी) येथे गेलो होतो तेव्हा पण खूप त्रास झाला होता. हा रस्ता झाला नाही तर पुढच्या काळात मोठे आंदोलन हाती घेतले जाईल.

यावेळी संविधान प्रचारक विशाल पवार, लोक अधिकार आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारकाताई पवार, दशरथ कोळेकर सर ग्रा पं सदस्य, रावसाहेब खोत मा. सरपंच, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांचेही मनोगते झाली. यावेळी सूत्रसंचालन संविधान प्रचारक अजिनाथ शिंदे यांनी केले. तर आभार गणपत कराळे यांनी मांनले. यावेळी उपस्थित दादासाहेब दाताळ पाटील मा सरपंच, विकास गोपाळघरे मा. सदस्य, कृष्णा खाडे सरपंच बाळगव्हाण, राहुल गोपाळघरे उपसरपंच, काकासाहेब शिकारे, अंकुश महानवर, नंदराम सावंत, मारुती सूळ, भीमराव सुरवसे, नितीन आहेर, लखन जाधव, रघुनाथ परकड मा. सरपंच लोणी, नानासाहेब वायकर मा सरपंच वाकी, भारत शिंदे मा सरपंच दिघोळ, शहाजी सोनवणे सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मण वाळके, सरदार चाचा मदारी, गौरव बागडे, कांतीलाल जाधव, अरुण शिकारे, कैलास शिकारे, करण काळखैर, अर्जुन काळखैर, गणपत सोनवणे, अशोक दाताळ, संतोष पवार, सुरज पवार, अनुज चौगुले, संतोष चव्हाण व खर्डा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





