

गफ्फारभाईंचे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्य कैतुकास्पद – सरपंच राजेंद्र ओमासे
पाटोदा येथे पिंपरखेड चे सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार.
जामखेड प्रतिनिधी
पाटोदा गाव म्हंटलं की प्रथम नामउल्लेख होतो तो म्हणजे सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण. कारण ते राजकीय क्षेत्रा बरोबरच धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य कैतुकास्पद आहे आसे मत पिंपरखेड चे सरपंच राजेंद्र ओमासे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र ओमासे यांची तर उपसरपंच पदी अविनाश गायकवाड यांची झाली .आज रोजी पाटोद्या चे सरपंच गफ्फार भाई पठाण यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी सरपंच बापुराव ढवळे, नजीर भाई, माजी सरपंच समीर पठाण, लहु पवार ,अर्शद पठाण, मुकुंद (आप्पा) कडु ,नवनाथ महारनवर, मच्छि्ंद्र लंगे, प्रकाश मोरे ,गोरख मुंगळे, प्रकाश कडु, सिद्दीक शेख ,शहाजी नवले,अलफैज शेख,आशोक महारनवर, जमीर सय्यद ,सुल्तान पठाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






