शेतकरी व वंचित लोकांच्या भावना जाणणारा नेता म्हणजे आ. रोहित पवार – प्रा विकी घायतडक

जामखेड प्रतिनिधी

आ.रोहित पवार हे गरीब, अनाथ, निराधार, कष्टकरी,शेतकरी,वंचितांचे नेते आहेत. सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणणारा नेता म्हणजे आ.रोहित पवार आहेत आसे मत सामाजिक कार्यकर्ते प्रा विकी घायतडक यांनी व्यक्त केले. यावेळी राजवीर विकी घायतडक व नम्रता सदाफुले यांचा वाढदिवस आ.रोहित पवार यांच्या समवेत साजरा करण्यात आला.

मोहा येथील निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, वंचित मुलांना शालेय साहित्य देऊन आ.रोहित पवार यांचा वाढदिवस पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक मित्रमंडळाने साजरा केला यावेळी आ. रोहीत पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नमंजुषा व संवाद साधत त्यांचे कौतुक केले. मुलांनी आ.रोहित पवार यांच्यासोबत गप्पा मारल्या व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना प्रा.विकी घायतडक म्हणाले आ.रोहित पवार हे गरीब, अनाथ, निराधार, कष्टकरी, शेतकरी,वंचितांचे नेते आहेत. सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणणारा नेता म्हणजे आ. रोहित पवार आहेत यावेळी राजवीर विकी घायतडक व नम्रता सदाफुले यांचा वाढदिवस आ.रोहित पवार यांच्या समवेत साजरा करण्यात आला.

यावेळी नगरसेवक अमित जाधव, ऍड.हर्षल डोके, बौद्धचर्य अशोक आव्हाड सर, अमोल गिरमे, प्रवीण उगले, दीपक सदाफुले, वसीम सय्यद, रिपाईचे जिल्हा सरचिटणीस धरमदादा घायतडक, रुपेश निकाळजे, अजय अवसरे, अमर शेख, अवी डोके, भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखा रतन सदाफुले, सुरेखा अनिल सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे आयोजन हे प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमास महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अमोल सदाफुले, कबिर घायतडक, गौरव सदाफुले,स्वप्निल राणा सदाफुले, योगेश बाळा सदाफुले, गणेश घायतडक, पप्पुराज सदाफुले, बाबा सोनवणे, पिल्ले अत्तार, बिपिन आखाडे, शुभम सदाफुले,हर्षवर्धन घायतडक, गितराज सदाफुले, प्रितम घायतडक, शुभम घायतडक, रोशन सदाफुले, सुमित घायतडक इ नी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here