आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन पवार यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त माजी नगरसेवक मोहन पवार यांच्या वतीने दि २२ रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी व आहार विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक मोहन पवार यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याअनुषंगाने आ रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत बी.पी. व शुगर तपासणी. वजन वाढवणे किंवा वजन कमी करणे यावर उपाय ,मार्गदर्शन व शरीरातील चरबीचे विश्लेशन समतोल आहार मार्गदर्शन व योग विषयक मार्गदर्शन मोफत केले जाणार आहे.
संबंधित रुग्ण व जनसामान्यांना त्यांचा आरोग्य प्रिषयक , अडचणी विषयी बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे .तपनेश्वर रोडवरील संजिवनी हॉस्पिटल येथे शिबीराचे आयोजन केले असून शिबीरासाठी डॉ.रविंद्र चव्हाण मो. 9552091079, डॉ. ऋतुजा सावंत मो. 7420962011 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन शिबिराचे आयोजक जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.