एसटीच्या पत्र्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाची स्वप्नं छाटली; एस टी पत्रा कापल्याने दोघांचे हात खांद्यापासुन झाले वेगळे
बुलढाणा : बुलढाण्यात मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास आव्हा गावाजवळ तिघा जणांना गंभीर जखमी केले. यामध्ये ४५ वर्षीय शेतकरी परमेश्वर सुरडकर यांचा हात कापला गेला. तर बसच्या पत्र्याने अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन युवकांनाही जखमी केले.
एसटी बसचा बाहेर आलेला पत्रा तिघा जणांसाठी धोकादायक ठरला. रस्त्यावरुन चालणाऱ्या शेतकऱ्याचा हात दंडापासून वेगळा झाला, तर पोलीस भरतीची तयारी करणारा युवकही या पत्र्यामुळे आपला हात गमावून बसला आहे. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मलकापूर डेपोत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने शुक्रवारी सकाळी ६ वाजता आव्हा गावाजवळ तिघा जणांना गंभीर जखमी केले. यामध्ये ४५ वर्षीय शेतकरी परमेश्वर सुरडकर यांचा हात कापला गेला. त्यांना तातडीने मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
या बसच्या पत्र्याने पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन युवकांनांही जखमी केले. त्यात विकास गजानन पांडे (२२ वर्ष) याचा समावेश आहे. त्याचाही हात कापून धडावेगळा झाला आहे. विकास हा अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करत होता. ही बस (एम एच ४० एन ९१२१) ही मलकापूर डेपोची आहे. तिचा चालक देवराव भावराव सूर्यवंशी आहे. शेतकरी आणि युवक दोघांची प्रकृती गंभीर आहे.
संतप्त नागरिकांनी केली आगारप्रमुखांच्या कार्यालयात तोडफोड
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आगारप्रमुख दादाराव दराडे यांना आगारात बोलावून घेतले. काही क्षणातच संतप्त गावकऱ्यांनी आगारप्रमुखांच्या कार्यालयात तोडफोड केली. आगारप्रमुखांवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कसाबसा हात निसटून आगारप्रमुखांनी पळ काढल्याने ते बाल बाल बचावले आहेत. या घटनेनंतर चालक देवराव भावराव सुर्यवंशी यांनी एसटी धामणगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा केली आहे. मलकापूर एसटीच्या स्थानकावर मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here