बस वेळेवर येत नसल्याने सावरगावच्या विद्यार्थ्यांनी केला बसडेपोच बंद
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील सावरगाव व धोत्री या ठीकाणी शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी एस टी बस वेळेवर येत नसल्याने आखेर शाळेतील विद्यार्थ्यांनीनी थेट आज एस टी बस डेपो मध्येच ठीय्या आंदोलन करत काही काळ बस डेपो बंद केला. या नंतर अगारप्रमुख यांनी बस वेळेवर सोडण्याचे अश्वासन दिल्या नंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोन मागे घेतले.
सावरगाव सह धोत्री या ठीकाणी रहाणार्‍या इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या चाळीस ते पन्नास विद्यार्थीनी या जामखेड येथिल कन्या विद्यालय व ल. ना होशिंग विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज एस टी बस ने प्रवास करतात. मात्र जामखेड अगाराची एस टी बस वेळेवर येत नसल्याने याबाबत सावरगाव येथील ग्रामस्थ व पालकांनी आनेक वेळा बस डेपो मध्ये येऊन लेखी निवेदने दिली. मात्र तरी देखील शाळेच्या वेळेत साकतकडे जाणारी एकही बस वेळेवर येत नव्हती. दररोज शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यीनींना सावरगाव फट्या पासुन ते गावापर्यंत बस वेळेवर येत नसल्याने दोन तीन कीमी चे आंतर पायी चालत विद्यार्थिनींना घरी जावे लागत आसे. त्यामुळे मुलींना दररोज घरी येण्यासाठी आंधार पडत असल्याने पालक देखील चिंतेत पडत असत.
आखेर आज दि १३ सप्टेंबर रोजी संतप्त झालेल्या विद्यार्थीनींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेत ग्रांमस्थांसह एस टी बस डेपो गाठत गेटवरच ठीय्या आंदोलन केले व एस टी डेपो बंद पाडला. त्यामुळे काही तास काही बस अगारात व अगाराच्या बाहेर आडकुन पडल्या होत्या.
या वेळी विद्यार्थीनींनी एस टी नाय तर पास कशाला, आम्हाला एस टी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे आम्हाला एस टी मिळालीच पाहिजे, आशा घोषणा दिल्या. या वेळी शाळेतील विद्यार्थीनी दिव्याराणी दादासाहेब ढवळे, ज्ञानेश्वरी शरद चव्हाण व स्वाती केशव गोरे या विद्यार्थ्यांनीनी आपल्या भावना व्यक्त करत वेळेवर बस पाठवण्याची मागणी केली.
या वेळी अगारप्रमुख शिंदे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व विद्यार्थीनी व ग्रामस्थांचे म्हणणे एकुण घेत येथुन पुढे वेळेवर बस सोडण्याचे अश्वासन दिले यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलना दरम्यान सावरगाव व धोत्रीच्या विद्यार्थ्यांनसह कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात, सरपंच काकासाहेब चव्हाण, उपसरपंच सचिन ढवळे, मुकुंद सपकाळ, आनिल माने असाराम ढवळे दादासाहेब थोरात, शुभाष कदम, भिमराव थोरात, दादासाहेब ढवळे, राजमाने, कल्याण सपकाळ, महादेव फाळके, भास्कर ढवळे, उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here