जामखेड प्रतिनिधी, दि ५ सप्टेंबर २०२२ (रोखठोक न्यूज)

(अविनाश बोधले) आखेर आनेक दिवसांच्या प्रतिक्षे नंतर कुसडगाव येथे आ.रोहित पवार यांनी मंजुर करुन आणलेल्या भारत बटालियन ट्रेनिंग सेंटरच्या कामास सुरुवात झाली आहे. जामखेड सारख्या दुष्काळी पट्ट्यात होणार्‍या या केंद्रामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

याबाबत सविस्तर असे की, आ. प्रा राम शिंदे हे राज्यमंत्री असताना २०१७ साली भारत राखीव बटालियन (राज्य राखीव पोलिस बल गट ) चे मुख्यालया करीता जामखेड तालूक्यातील कुसडगाव येथे व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे होणारे भारत बटालियन ट्रेनिंग सेंटर नेमके कोठे होणार आशी चर्चा रंगत आसताना दि १३/९/२०१९ रोजीच्या शासनाच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार हे केंद्र संदर्भ क्रमांक १ नुसार या भारत बटालियन ट्रेनिंग सेंटर पुन्हा जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळ तालुक्यातील हातनूर वरणगाव या ठिकाणी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.

या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि या प्रकरणी आ. रोहित पवार यांनी माझ्या मतदारसंघातून जळगाव ला गेलेले हे ट्रेनिंग सेंटर पुन्हा आपल्या मतदारसंघात व्हावे यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते. यानंतर या केंद्रा संदर्भ क्रमांक २ नुसार दि ४/३/२०२० रोजीच्या अप्पर पोलीस महासंचालक यांनी जळगाव जिल्ह्य़ातील हे केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील गट क्रमांक ४१२ व ४१३ या शासकीय जागेवर निर्माण करण्याबाबत विनंती केली.

त्यानुसार शासनाच्या गृहविभागाच्या वतीने हे केंद्र जळगाव जिल्ह्या एवजी मंजूर पदासह खर्चासह नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे होण्यासाठी आखेर मान्यता देण्यात आली. या बाबत गृहविभागाने शासन निर्णय देखील जारी केला होता. आखेर या केंद्राला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात नीधी देखील आला आसुन प्रतिक्षात या ठीकाणी बांधकामास सुरुवात देखील झाली आहे. या भारत बटालियन केंद्रामुळे जामखेडच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या केंद्रासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेला जोरदार पाठपुरावा यशस्वी झाला आहे.

रोजगार उपलब्ध होणार

भारत बटालियन ट्रेनिंग सेंटरमुळे दुष्काळी असणाऱ्या जामखेड तालूक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.तसेच जामखेड तालुका, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, या जिल्हयाच्या सरहद्दीवर असून सरहद्दीवरील सर्व महामार्ग रस्त्यांनी जोडले जाणार आहेत. आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने हे ट्रेनिंग सेंटर कुसडगाव येथे उभे राहणार आसुन आता प्रत्येक्षात या केंद्राच्या बांधकामास देखील सुरूवात झाली आसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here