तलवाडा प्रतिनिधी

बीड जिल्ह्य़ातील तलवाडा तालुक्यातील भेडटाकळी तांडा या ठीकाणी शेतात आसताना लाईट च्या तारांना चिकटून आई व दोन लेकारांसह एकुण तिघांचा मुत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ललीता राठोड या शनिवारी दुपारी भेडटाकळी तांडा या ठीकाणी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या यावेळी त्यांची दोन्ही मुले सोबत होती. ही मुले शेतात खेळत आसताना वाजेच्या तारेला धक्का लागला व खाली पडली. ही घटना आईने पाहीली आणि ती मदतीसाठी धावली व तीला देखील विजेच्या तारेचा धक्का बसला. या घटनेत आई ललीता श्रीकांत राठोड वय ३० वर्षे, रा भेडटाकळी तांडा, मुलगा अभिजित श्रीकांत राठोड वय ८ वर्षे,व प्रशांत श्रीकांत राठोड वय वर्षे ११ तीघे रा भेडटाकळी तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दि ३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.







