आष्टी /कडा, प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील कडा परीसरात बारामती-पैठण रोडवरील चोभानिमगांव येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बापलेकाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

वडील अरूण सोन्याआबा औटे आणि मुलगा सुरज अरूण औटे अशी मृतांची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील नांदा येथील औटे पितापुत्र शेती करतात. आज सकाळीच दोघेही शेतातील भाजीपाला विक्रीसाठी कड्याकडे दुचाकीवरून घेऊन जात होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास , कड्यावरून मिरजगावकडे जाणार्‍या एका भरधाव कारची आणि दुचाकीची चोभानिमगांव जवळ समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घरातील दोन कर्ते पुरुष मृत झाल्याने औटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here