जामखेड प्रतिनिधी

(रोखठोक न्यूज ),साहेब गेल्या सात वर्षांपासून आम्ही मंजुर आसलेल्या घराच्या प्रतिक्षेत आहोत .पण आजुन काही न्याय मिळाला नाही .तुम्ही महालात आणि आम्ही पालात आहोत .त्यामुळे आता तरी आम्हाला कुणी घर देता घर आशा संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनात मदारी समाज्याचे व्यक्त केल्या .जोपर्यंत कामास सुरुवात होत नाही तो पर्यंत जाग्यावरुन उठणार नाही आसा इशारा वंचित बहुजन आघाडीचे भटके-विमुक्त राज्य समन्वयक अॅड अरुण जाधव यांनी धरणे आंदोलना दरम्यान व्यक्त केले .

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३१ अॉगष्ट रोजी खर्डा चौकात अॉड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले होते.मात्र तरी देखील प्रशासनाकडु काम सुरू न झाल्याने आखेर आज दि १ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा जामखेड पंचायती कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडी व मदारी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या धरणे आंदोलनात लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापु ओहोळ ,ता.अध्यक्ष विशाल पवार,वं. ब.आघाडीचे जि. उपाध्यक्ष योगेश सदाफुलें,ता.अध्यक्ष आतिष पारवे,शहर अश्याक्ष आजीनाथ शिंदे,खर्डा येथील मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, मुस्तफा मदारी, कबीर मदारी, फकीरा मदारी, सागर ससाने, रहीम मदारी, फकीर मदारी, मोहम्मद मदारी, असलम मदारी, सिकंदर मदारी, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे, म.जि. अध्यक्ष द्वारका पवार, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे,गनपत कराळे, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण,, तुकाराम पवार, आणि अरुण डोळस,शहानुर काळे,पोपट फुले(लहुजी शक्ती सेना),उमेश काळे,कुसुम शिंदे,भीमराव सुरवसे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

मदारी समाज्याची वसाहत व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ५ आंदोलने झाली तरी देखील मंजुर आसलेल्या वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. यावेळी मदारी समाजाच्या वतीने लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत मध्ये म्हंटले आहे की आम्हाला फक्त आश्वासने मिळाली आहेत मात्र प्रत्यक्षात काम सुरु झाले नाही ,मंजुरी मिळाली ,नीधी वर्ग झाला सर्व अडथळे दुर करीत अंतिम स्टेजला पोहचलो आहोत .पण काम सुरू झाले नाही लोकप्रतिनिधी महालात आणि आम्ही पालात कीती दिवस रहायचे कुणी घर देता घर रहायला घर नाही आशा संतप्त प्रतिक्रिया मदारी समाजाच्या वतीने देण्यात आल्या .

 

 

वंचित बहुजन आघाडीचे भटके-विमुक्त राज्य मन्वयक अॅड अरुण जाधव यांनी देखील आंदोलना दरम्यान आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या .ते म्हणाले की सात वर्षांपासून दोन सरकार बदलले तालुक्यातील आनेक कामे सुरू झाली आणि चालु आहेत पण मदारी समाजाच्याची वसाहत सुरू झाली नाही .अडीच एकर जागेत २० घरे आहेत सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊनही ही कामे सुरु झाली नाहीत. आम्ही अधिकार्‍याचे लेखी आश्वासन घेणार नसुन जोपर्यंत वसाहतीचे काम सुरु होत नाही तो पर्यंत आमचे हे धरणे आंदोलन सुरूच रहाणार आहे आसे मत अॉड अरुण जाधव यांनी व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here