जामखेड प्रतिनिधी

शहरातील सर्वात जुने व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोर्ट रोड येथील संघर्ष मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन राळेभात पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमासह महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करत शहरातील शहरातील कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाचे मंडळाचे ४० वर्षांहून अधिक काळापासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे. मंडळाची स्थापना सन १९८५ साली झाली असून मंडळाची गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रारंभीच्या काळापासूनच प्रबोधनाचा वारसा मंडळाने जोपासला आहे.

गेली काही वर्षें गणेशोत्सवामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवित आले आहे. श्री प्रतिष्ठान संचलित संघर्ष मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची काल दि ३० रोजी बैठक मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष निमोणकर पराग शिंदे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती,

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष कुंडल औचरे, सचिव ओंकार दळवी, खजिनदार अनिल लोहकरे, अमित भंडारी, दीपक ढोले, प्रीतम काथवटे, स्वप्नील बरबडे, संजय फुटाणे, विनोद लोळगे, शिवकुमार डोंगरे, अमोल चिंतामणी, दत्ता चव्हाण, आंनद गांधी, अमोल लोहकरे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन राळेभात यांची निवड करण्यात आली चेतन राळेभात यांच्या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून पुढील काळात नव्या जोमाने सामाजिक, शैक्षणिक, लोकोपयोगी उपक्रम राबवत आदर्शवत परंपरा कायम जोपासणारे असल्याचे मंडळाचे नूतन अध्यक्ष चेतन राळेभात यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here