केज प्रतिनिधी

पुण्याहून नांदेडकडे निघालेली ओम साईराम या ट्रॅव्हल एजन्सीची खाजगी बस केज तालुक्यातील मस्साजोग जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून पुलाच्या खाली गेली. या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.


पुण्याहून नांदेडकडे निघालेली ओम साईराम या ट्रॅव्हल एजन्सीची खाजगी बस पाटोदा केज रोडवरील केज तालुक्यातील मस्साजोग जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून पुलाच्या खाली गेली. हा अपघात बुधवारी (दि.३१) पहाटे झाला.


सदरील अपघातात जयश्री जोंधळे, कान्होपात्रा करपेवाड, सीताबाई माळी आणि उषा रानेवाड हे चार प्रवासी जखमी झाले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेचे पायलट हंगे आणि डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.







