जामखेड प्रतिनिधी

मंजुरी मिळुन निधी वर्ग झाला, आनेक आंदोलने झाली, मात्र खर्डा येथिल मदारी वसाहतीचा प्रश्न सुटला नाही. अद्यापही काम सुरू न झाल्याने बंचित बहुजन अघाडीच्या वतीने ३१ अॉगस्ट २०२२ रोजी भटके विमुक्त दिना निमित्तान जामखेड शहरातील खर्डा चौक या ठीकाणी निर्देशने करण्यात येणार असल्याची माहिती अॉड अरुण जाधव यांनी दिली.

यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या अंमलबजावणी करिता अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. या वसाहतीकरिता वंचित बहुजन आघाडीचे ५ आंदोलने तहसील कार्यालय व पंचायत समिती जामखेड समोर झाली आहेत. तरीही अद्याप मदारी वसाहतीचे बांधकाम चालू झाले नाही. अनेक आश्वासने मिळाली. पण मदारी वसाहतीचे बांधकाम चालू झाले नाही. ७ वर्ष होऊनही फक्त आश्वासना पलीकडे मदारी समाजास काहीही मिळाले नाही. मंजुरी मिळाली, निधी वर्ग झाला. सर्व अडथळे दूर करीत अंतिम स्टेजला काम आले आहे. पण मदारी वसाहतीचे काम चालू होऊ शकले नाही. म्हणून पुन्हा वंचित बहुजन आघाडी मार्फत ३१ ऑगस्ट २०२२ रोजी भटके विमुक्त दिनानिमित्त जामखेड येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.

तसेच १ सप्टेंबर २०२२ पासून पंचायत समिती जामखेड समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत बांधकामास सुरुवात होणार नाही. तोपर्यंत पंचायत समितीच्या समोर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव व सर्व पदाधिकारी बसणार आहेत.

या निदर्शनास उपस्थित लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, लोक अधिकार आंदोलनाचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, लोक अधिकार आंदोलनाच्या जिल्हा महिला अध्यक्षा द्वारकाताई पवार, मच्छिंद्र जाधव, संविधान प्रचारक गणपत कराळे, भीमराव सुरवसे, नितीन आहेर, लखन जाधव, सागर ससाने, मोहन शिंदे, बाबासाहेब फुलमाळी, फकीर मदारी, मुस्तफा मदारी, सलीम मदारी, कदीर मदारी, तसेच सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी दिलीआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here