जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले) 

गेल्या आडीच वर्षांपासून आ. रोहित पवार हे कर्जत जामखेड चे आमदार झाल्या पासून त्यांनी आपल्या विकासाच्या जोरावर व आयोजित करण्यात येत आसलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम आसो कींवा व्यवसायाच्या दृष्टीने बचत गटाच्या माध्यमातून महीलांची उभी केलेली फळी आशा विविध माध्यमातून आ. रोहित पवार यांची क्रेज वाढत चालली आहे. आलीकडे त्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना लहानांन पासुन मोठ्या पर्यंत होणारी गर्दी ही विरोधकांची धडकीतर वाढवत नाही ना आशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

आ. रोहित पवार विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आणि ते मोठ्या फरकाने निवडुनही आले. त्यातच महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्या वेळी आसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार च्या माध्यमातून मागील आडीच वर्षात कर्जत जामखेडच्या विकास कामांचा धडाका सुरू झाला. विकास करत असताना विरोधकांन कडु मोठ्या प्रमाणात टीका देखील होत होती. विरोधक म्हणत होते की चॉकलेट व गोळ्या वाटुन कुठ राजकारण होत आसतं का? पण या गोष्टींना न जुमानता आ. रोहित पवार हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने राजकारण करत राहिले. विकास कामांच्या माध्यमातून आपण नजर फिरवली तर आ. रोहित पवार यांनी जामखेड शहरासाठी नवीन एस टी बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालयात, नवीन पोलीस वसाहत, नगरपरिषद कार्यालय, नाना नानी पार्क, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासीका केंद , जामखेड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, कुसडगाव येथील भारत बटालियन केंद्र, नवीन शासकीय विश्रामगृहा बांधण्यासाठी नीधी, तलाठी कार्यालय, जामखेड पंचायत समितीच्या वरच्या मजल्यावरील इमारत या सह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना भरीव निधी व तालुक्यातील आनेक विकास कामांना देखील विकास नीधी आणला ती कामे सुरू देखील केली. मात्र ही कामे करत आसताना आ. रोहित पवार यांनी जनतेची नाळ कधी तुटु दिली नाही. कामय मतदारसंघातील जनतेच्यासाठी वेळो वेळी दैरे करत जनतेच्या संपर्कात रहात आहेत.

आ. रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी देखील महीलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी कर्जत आणि जामखेड तालुक्यात मोठय़ा प्रमाणात महीलांचे बचत गट स्थापन करुन रोजगार उपलब्ध करून दिला. या माध्यमातून देखील महीलांची मोठी फळी आ. रोहित पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे आजही उभी आहे. आ. रोहित पवार यांचे लहान मुलांवर देखील प्रचंड प्रेम आहे. लहान मुलांना देखील खाऊ वाटपाच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यावर कायम मायेचा हात फिरवत आसतात. त्यामुळे प्रत्येक लहान मुलांच्या तोंडी आपल्या घरात आ. रोहित दादा पवार यांचे नाव आल्याशिवाय रहात नाही.

आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने वयोवृद्ध व्यक्तींसाठी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आसेल कींवा इतर शस्त्रक्रिया आसतील त्या पुण्यासारख्या नामांकित हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने रुग्णांना नेहुन त्यांच्यावर योग्य उपचार करुन पुन्हा त्या व्यक्तींना आपल्या घरी पोहच करण्याचे काम देखील आ. रोहित पवार हे गेल्या आडीच वर्षांपासून करत आहेत. परीणामी कर्जत आणि जामखेड येथिल लोकांच्या लाखो रुपयांचा आरोग्याचा खर्च वाचत आहे. त्यामुळे या वयोवृद्ध लोकांचे आशिर्वाद व कैतुकाची थाप कायम आ. रोहित पवार यांच्या पाठीवर पडत आहे.

हे सर्व करत असताना आ. रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील वेळोवेळी जनतेच्या मनात घर करुन राहिले आहेत. खर्डा येथिल स्वराज्य ध्वज, कर्जत येथील सांस्कृतिक कार्यक्रम, व बैलगाडी शर्यत स्पर्धा , जामखेड येथिल आमृत महोत्सवा निमित्ताने जामखेड फडकवण्यात आलेला १०० फुट तिरंगा ध्वज आसेल कींवा नुकतीच झालेली दहीहंडी उत्सव कार्यक्रम आशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील आ. रोहित पवार यांची क्रेज कायम आहे. कारण त्यांच्या प्रत्येक कार्यकमाला लहान मुलांसह मोठ्या व्यक्ती आसतील कींवा वयोवृद्ध आसतील या सर्वांची उपस्थित त्यांच्या कार्यक्रमास दिसत आहे.

तसेच आ. रोहित पवार यांच्या कार्यक्रमांची होणारी गर्दी ही दिवसोंन दिवस वाढत चालली आहे ती त्यांच्या योग्य नियोजन चाणाक्ष बुध्दी आणि जमिनीवर पाय ठेऊन चालण्याची पद्धत लोकांच्या सुखदुःखात व मदतीला धावून जाणारा आमदार म्हणून कर्जत जामखेड मध्ये त्यांची ओळख आहे. आशा विविध कार्या मुळे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांना लाखोंची गर्दी होणारच यात काही शंका नाही. मात्र हीच गर्दी आता विरोधकांना धडकीतर भरणारी नाही ना असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here