अहमदनगर प्रतिनिधी

लातूर कडून शिर्डी कडे जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बस ला नगर जामखेड रोडवरील आठवड घाटात रात्री उशिरा अपघात झाला. या घाटात वारंवार अपघात होत असल्याने येथे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

जामखेड नगर रस्त्यावर आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा संपल्यानंतर लगेच नगर तालुक्याची हद्द सुरू होते याच ठिकाणी सलग उतार असल्याने अनेक वेळा वाहने कठडा तोडून पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता. पुन्हा या ठिकाणी अपघात झाला आहे. मागिल पंधरा दिवसांपुर्वीच नगर – जामखेड रोडवरील वाघळूज घाटात देखील तेलाने भरलेला टँकर पलटी झाला होता.

नगर तालुका पोलीस ठाण्याचे पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रॅव्हल्स लातूर हुन शिर्डी कडे जात होती. या घाटात जोराचा स्पीड असल्याने टायर फुटून गाडी पलटी झाली. ए. आर. 01 जे. 3233 क्रमांकाची प्रवासी बस असून पूर्ण प्रवाशांनी भरलेली होती.गाडी पलटी झाल्यानंतर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाडीतील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून उर्वरित प्रवासी सुखरूप आहेत.गाडी पलटी झाल्यानंतर ड्रायव्हर च्या समोरची काच फोडून प्रवासी बाहेर पडले.





