जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५१ कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान केले. या नंतर रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना आयोजकांन कडुन मोफत हेल्मेट व पाण्याचा जार वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात महीला व मुलींनी देखील रक्तदान केले.

कोरोना काळात महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. याच अनुषंगाने आज शनिवार दि १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आ. रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित जाधव मित्र मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अमोल लोहकरे, फीरोज बागवान , पप्पू शिरगीरे व राष्ट्रवादी जामखेड शहर यांनी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर आबा राळेभात यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत नाना मोरे, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले, शिवसेना प्रमुख संजय काका काशिद, सुनिल लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनिल लोंढे, शहाजी काका राळेभात, नगरसेवक डीगंबर चव्हाण, पवनराजे राळेभात, प्रहार संघटनेचे चे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले सर अॅड हर्षल डोके सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबीरास सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक महेश निमोणकर, संजय वराट प्रा लक्ष्मण ढेपे, विकास राळेभात सह अनेक मान्यवरांनी भेट दिली. एकुण २५१ जणांनी या शिबिरात रक्तदान केले विषेश म्हणजे महीलांनी देखील या रक्तदान करुन एक सामाजिक ठसा उमटविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अमित जाधव राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अमोल लोहकरे, फीरोज बागवान व पप्पू शिरगीरे यांनी खास परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here