जामखेड प्रतिनिधी
खर्डा येथील ईट रस्ता ते हत्तीमहल येथील रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. दुर्गंधीने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांना साथीच्या आजाराने त्रस्त केले असून खर्डा ग्रामपंचायतचे या भागाकडे दुर्लक्ष झाले असल्याने येथील ठिकाणी सिमेंट रस्ता, गटार व सार्वजनिक शौचालय होण्याची गरज निर्माण झाली आहे.

खर्डा ग्रामपंचायतची या भागात घनकचरा निर्मूलन घंटागाडी सुद्धा या ठिकाणी येत नाही, त्यामुळे येथील रहिवाशांना घरातील कचरा व घाण या ठिकाणी रस्त्यावर आणून टाकावे लागत आहे.त्यामुळे येथील हत्तीमहल या भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे,पुढील काळात खर्डा ग्रामपंचायत ने लक्ष घालून येथील सिमेंट रस्ता गटार व सार्वजनिक शौचालय करणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांनी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत.






