जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर अल्पदरात भरवण्यात आलेल्या नागेश्वर आनंदनगरीचा आनंद घ्यावा असे आवाहन संपत (नाना) राळेभात व राम पवार यांनी केले आहे.

दोन वर्षांच्या कोरोना लॉक डाऊन नंतर जामखेड शहरात ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश विद्यालयाजवळील व बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मैदानावर अल्पदरात भरवण्यात आलेल्या नागेश्वर आनंदनगरी मध्ये आकाशी पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुआ, टोरा टोरा, रेल्वे, बोट, लहान मुलांचे विविध करमणूकीची साधने अशा आनंदनगरीचा मेळा भरला आहे. त्याचा तिकीट दर अत्यंत माफक दरात म्हणजे फक्त तीस ते चाळीस रुपये ठेवण्यात आला आहे तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक संपत राळेभात व राम पवार यांनी केले आहे.

दोन वर्षांच्या कालखंडानंतर जामखेड मध्ये नागेश्वर यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक भक्तांच्या आनंदासाठी आनंदनगरीचे आयोजन करण्यात येते यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक पाहण्यासाठी येतात. संपत राळेभात व राम पवार यांनी आनंदनगरीचे आयोजन केले आहे आणि तिकीट दरही अत्यंत कमी म्हणजे फक्त तीस ते चाळीस रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या भाविक भक्तांना नागपंचमी निमित्ताने संपत राळेभात व राम पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ना नफा ना तोटा तत्वावर असणाऱ्या आनंद नगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here