जामखेड प्रतिनिधी

जामखेड पासून तीन किलोमीटर अंतरावर लेहनेवाडी रस्त्यावर एक मोठं कासव प्रा. शिवाजी राळेभात यांना रस्त्यावर चाललेले दिसले. यावर त्यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना ताबडतोब माहिती दिली. कोठारींनी तातडीने लेहनेवाडी रस्त्यावर जात, वनपाल प्रवीण उबाळे यांना ही माहिती दिली. तहसीलदार योगेश चंद्रे , वनाधिकारी श्री शेळके यांनाही माहिती दिली.

वनपाल प्रवीण उबाळे हे आपल्या सहका-यासह लेहनेवाडी रस्त्यावर दाखल झाले.यावेळी वनपाल उबाळे यांनी कासव ताब्यात घेवून, त्याची संपूर्ण तपासणी केली. कासवाला कुठेही जखम आढळून आली नाही. कासव आणि घटनास्थळाचा रितसर पंचनामा करून, शहरालगतच्या भुतवडा तलावात कासव सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक किसन पवार, शामराव डोंगरे, भाऊसाहेब भोगल हे वन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दत्ताभाऊ लेकुरवाळे, अक्षय जगताप, कृष्णा जगताप, अनिल बाबर, ओंकार जगताप, प्रदीप वैष्णव, मनोज मगर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here