जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी चंदन एजन्सीज् & डिस्ट्रीब्युटरचे संचालक अदित्य चंदन यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी पवन डिस्ट्रीब्युटर्सचे प्रशांत फुटाणे, सचिवपदी नागेश्वर एजन्सीज् सुरेश थोरवे व खजिनदारपदी ढवळे एजन्सीचे बापू ढवळे यांची निवड झाली.

जामखेड तालुक्यातील विविध व्यवसाईकांकडे विविध कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्स शिप आहेत. या सर्व डिस्ट्रीब्युटर्सची काल दि. २९ जूलै रोजी नुकतीच बैठक संपन्न झाली. यामध्ये एजन्सी धारकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी करण्यात आलेल्या चर्चेतून आपलीही एक संघटना असावी असा विचार पुढे आला. व त्यानुसार जामखेड तालुका डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. व संघटनेच्या प्रथम अध्यक्षपदी चंदन एजन्सीज् & डिस्ट्रीब्युटरचे संचालक अदित्य चंदन, उपाध्यक्षपदी पवन डिस्ट्रीब्युटर्सचे प्रशांत फुटाणे, सचिवपदी नागेश्वर एजन्सीज् सुरेश थोरवे व खजिनदारपदी ढवळे एजन्सीचे बापू ढवळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यातआल्या.


तसेच जामखेड तालुका डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य म्हणून आत्मामालिक एजन्सीचे विनीत गुंदेचा, अरिहंत मेडिकलचे संजय भंडारी, आनंद एजन्सीचे आनंद गांधी, बालाजी एजन्सी सचिन फिरोदिया, चंद्रमा एजन्सी उमेश जगताप, दत्त गोळी अजिंक्य जाधव, जिनेंद्र एजन्सी हिम्मत गांधी, जाधव एजन्सी आण्णासाहेब जाधव, गणेश बेकरी & एजन्सी विजय डोंगरे, कानडे एजन्सी प्रशांत, काकडे पाटील एजन्सी बी. एस. काकडे, प्रिती एजन्सी किरण उदारे, प्रकाश खेत्रे, पवार भेळ ( खर्डा ) सुरज पवार, प्रतिक्षा एजन्सी बाळासाहेब मोरे,

पवन डिस्ट्रीब्युटर्स प्रशांत फुटाणे, रेणूका एजन्सी निलेश कोल्हे, रविंद्र एजन्सी अनिल मेहेर, ऋषभ एजन्सी प्रविण गादीया, शहा एजन्सी ( खर्डा) स्वप्निल शहा, स्नेहल एजन्सी राळेभात सर, श्रेयश एजन्सी सागर दहातोंडे, सागर एजन्सी सागर गुळवे, एस. आर.इ. पॉवर इंडस्ट्रीज किशोर मिसाळ, शिवशंकर एजन्सीज् कुलदीप पवार, श्रद्धा एजन्सी राजू गवळी, श्री मेडीकल संकेत भळगट, एस. एस. एस. एजन्सी अकील शेख, अशोककुमार अमितकुमार बोरा, अनिल बोरा यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here