जामखेड प्रतिनिधी
काही महीन्यांपासून कोरोनाची धास्ती कमी झाल्याने आणि त्याचबरोबर शासनाने मास्क मुक्तीबरोबरच निर्बंधही शिथिल केल्याने या वर्षी तब्बल दोन वर्षांनी जामखेड ची नागपंचमी यात्रा भरणार आहे. याच अनुषंगाने जामखेड येथे शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी योग्य ती खबरदारी घेऊन यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आसे अश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले.

कोरोनाच्या आगमनानंतर गेल्या दोन वर्षापासून जत्रा-यात्रामध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करून शासनाने सण-समारंभावर निर्बंध लागले होते.मात्र तब्बल दोन वर्षांनी जामखेड ची नागपंचमी यात्रा भरणार आसल्याने नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने जामखेड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जामखेड येथिल पंचायत समिती कार्यालयात शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, महावितरणचे अधिकारी योगेश कासलीवाल, मार्केट कमिटीचे सचिव वाहेदभाई शेख, प्रा मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मंगेश आजबे, भाजपा तालुका अध्यक्ष अजयदादा काशिद, म. न. से तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, नगरसेवक डीगंबर चव्हाण, शामीरभाई सय्यद, पवनराजे राळेभात, अमित जाधव, उमर कुरेशी, पांडुराजे भोसले, विकी सदाफुले, प्रा विकी घायतडक, राजेश मोरे, संपत राळेभात, अभिजीत राळेभात, सचिन देशमुख, गणेश मासाळ सह अनेक नागरिक उपस्थित होते.

नागपंचमी यात्रेत शहरातील लाईट ची व्यवस्था, सी सी टी व्ही ची व्यवस्था यात्रे मध्ये आसली पाहिजे, तसेच यात्रेत वहान पार्किंग व येणार्या नागरीकांच्या दुचाकी चोरी जाणार नाहीत तसेच महीलांच्या सुरक्षेसाठी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच नागेश्वर पालखी ला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. जामखेड शहरात ज्या ठिकाणी कुस्त्यांचा हगामा भरणार आहे त्या साठी पार्किंग ची व्यवस्था केली पाहिजे, शहरात पावसाळ्यामुळे खड्डे पडले आहेत ते नगरपरिषदेने बुजवले पाहिजेत, चार पाच दिवस लाईट जाणार नाही याची काळजी महावितरण कंपनीने घ्यावी अशी माहिती उपस्थित आसलेल्या मान्यवरांनी केली.

याला उत्तर देताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की महाराष्ट्रतुन या नागपंचमी यात्रेस लोक येतात. यात्रा सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित व शांततेत पार पाडु. नागरीकांनी मांडलेल्या सुचना नुसार चुकीच्या पद्धतीने काम होत आसेल तर कारवाई होणार आहे. सर्व अधिकार्याना सोबत घेऊन ज्या ठिकाणी आनंदनगरी भरणार आहे त्या ठिकाणी पहाणी करुन जागा आखुन देण्यात येतील व उपाययोजना करण्यात येतील. शहरातील खड्डे देखील बुजविण्यात येतील, पालखी मार्गाला आडचण येणार नाही यांची काळजी घेतली जाईल, कुस्ती साठी पार्किंग ची सोय मराठी शाळेबरोबरच अन्य ठिकाणी जागा पाहून करण्यात येईल.






