जामखेड प्रतिनिधी
कोरोना कमी झाला, एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, शाळाही सुरू झाल्या मात्र आजुनही शालेय विद्यार्थींसाठी ग्रामिण भागातील एस टी अनेक ठिकाणी बंदच आहे. त्यामुळे अनेक मुलींना शाळेत जाताना खाजगी वहाणाने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तर काही ठिकाणी बस सुरू आसुन त्या वेळेवर येत नाहीत.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे आसे आपण म्हणतो मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीसाठी सुरू आसलेली एस टी सेवाच सध्या बंद आसल्याने कीती मानसिक त्रास सहन करावा लागतो ते या विद्यार्थ्यांनीनाच माहित आहे.

जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठया संख्येने तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र एसटी नसल्याने मिळेल त्या वाहणाने जामखेड येथे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. काही विद्यार्थी व विद्यार्थीनीने सांगितले की, तासंतास वाट पाहून सुध्दा वाहन मिळत नसल्याने अनेकदा शाळा बुडत आहे. खासगी प्रवाशी वाहतूक करणारी गाडी पूर्णपणे भरल्या शिवाय जात नाहीत. त्यामुळे येण्या जाण्यातच प्रवास करावा लागत आसल्याने शाळेचा अभ्यास होत नाही.

सर्वाधिक नुकसान विद्यार्थिनींचे होत आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शहरात कधी कधी येतात किंवा गावी जाऊ शकतात. विद्यार्थिनींना मात्र अनेक मर्यादा येत असल्याने त्यांना शाळेत अथवा गावी जाण्यासाठी मोठा माणसीक त्रास सहन करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांनीना ये जा करण्यासाठी खाजगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुली व मुले शाळेत पाठविले जात आहेत. जुन्या खाजगी वाहणातून होणारी अवैध वाहतूक परीवहन विभागाच्या आशीर्वादाने चालू आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. काही घटणा घडल्यावर परीवहन विभागाचे अधिकारी या लक्ष देणार का? या प्रश्नाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष्य लागले आहे.





