जामखेड प्रतिनिधी

नान्नज येथील आषाढी यात्रेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन सर गायवळ यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या मित्रपरिवारास सोबत रथाचा नारळ वाढवून दर्शन घेतले, या वेळी प्रा. सचिन गायवळ सर यांनी जिल्हा परिषद लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे पुढील भावी राजकीय इनिंगची या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरुवात केल्याचे सर्वत्र चर्चिले गेले.

याबाबत माहिती अशी की नुकतीच नान्नज येथील आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात भरवण्यात आली होती त्यासाठी नान्नज परिसरातील अनेक भावी भक्त दर्शनासाठी आले होते त्यासाठी सचिन सर गायवळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना फोन करून व सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी अकरा वाजता नान्नज येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्ते नान्नज येथील मित्र प्रेम हॉटेलच्या प्रांगणात जमा झाले त्यानंतर सर्व मित्र परिवार पायी चालत जाऊन सर्वांनी रथाचे दर्शन घेऊन व मानाच्या रथाची दोरी ओढून प्रारंभ केला यावेळी मोठे भक्तिमय वातावरणात तयार झाले होते, त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित चहा वाटपाचा कार्यक्रम झाला.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी प्रा. सचिन सर गायवळ यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले त्याला अनेक जाणकारांकडून दूजोराही देण्यात आला.


परंतु यावेळी सचिन सर गायवळ म्हणाले की आज आपण नान्नज येथे धार्मिक कामासाठी व दर्शन घेण्यासाठी जमलो आहोत आज फक्त देवदर्शनासाठी एकत्र आलो आहोत पुढील काळात राजकीय भूमिका सर्वांबरोबर चर्चा करून सर्व कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले.
परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रा. सचिन गायवळ यांना आगामी जिल्हा परिषद साठी भावी उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी गळ घातली त्यामुळे पुढील काळात प्रा. सचिन सर हे खर्डा जिल्हा परिषद गटाचे आगामी भावी उमेदवार होण्याची शक्यता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेस पहावयास मिळाले ही मात्र निश्चित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here