जामखेड प्रतिनिधी

सदिच्छा मंडळाला मोठे खिंडार पडले असे जे म्हणतात त्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही ते बॅंक काय सांभाळणार शिक्षक बँकेच्या येत्या निवडणुकीत सदिच्छा शिवाय सत्तेत जाणे, कोणालाही शक्य नाही. यावेळी गुलाल सदिच्छाच घेणार असा विश्वास शिक्षक नेते राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. पंचवार्षिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा सदिच्छा मंडळाचा निवडणूक प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल १८ रोजी सायंकाळी जामखेड येथे संपन्न झाला. आजच्या या मेळाव्याला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे सर, शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते, इब्राहिम शेख सर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत सर , शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस बबन (दादा) गाडेकर , तसेच शिक्षक बँकेचे माजी संचालक मंडळाचे नेते गहिनीनाथ शिरसाट सर, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे, उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष गजानन ढवळे, मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष भोंडवे सर ,सिद्धनाथ कचरे सर,केशव कोल्हे, ज्ञानेश्वर कोळेकर, रजनीकांत साखरे, महादेव गांगर्डे, उद्धव दौंड, धर्माची बडे, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीम.कामिनी राजगुरू मॅडम, अर्चना भोसले मॅडम इतर बहुसंख्य शिक्षक – शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेंद्र शिंदे म्हणाले की एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे मंडळ म्हणजे सदिच्छा मंडळ आहे. सदिच्छा मंडळासोबत कायम जामखेड तालुका राहीला आहे. जामखेड ही सदिच्छा मंडळाची ढाल आहे. विरोधक स्वबळावरावर निवडुन येणार सांगतात पण त्यांचे बळ कधीच निघुन गेले आहे. सदिच्छा तुन अनेक मंडळे तयार झाली तरी पण सदिच्छा आजुनही ताठ मानेने उभी आहे. या निवडणुकीत विरोधकांची पडझड झाल्या शिवाय रहाणार नाही.

यावेळी बोलताना माधव हसे म्हणाले की, सदिच्छा मंडळाचा विजय कोणीही रोखू शकत नाही. विकास मंडळाची एक हाती सत्ता सदिच्छा मंडळाच्या ताब्यात द्या,सर्व सभासदांची आरोग्यदायी व आनंददायी सेवा करू.

रविंद्र पिंपळे म्हणाले की, महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत यातच आमचा विजय निश्चित आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना गोड बोलून,विकास मंडळाच्या नावाखाली 13 कोटी रुपये जमा केले,अन् बांधकाम अपूर्ण अवस्थेत ठेवले.त्यांचे मंडळ हे फक्त सोयर्या धायऱ्या चे मंडळ आहे.त्यांच्या स्वच्छ चेहऱ्याला भुलून जावू नका, या निवडणुकीत त्यांना घरी बसवा.

यावेळी बोलताना सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत म्हणाले की, मागील काही दिवसात मंडळातून काही शिक्षक बांधव दुसऱ्या मंडळात गेले व सदिच्छाला मोठे खिंडार पडले अशा आशयाच्या बातम्या येत होत्या , त्या बातम्या संपूर्ण चुकीच्या असून सदिच्छा मंडळातून दुसऱ्या मंडळात कोणीही गेले नाही व जाणारा ही नाही. त्याच मंडळातील जुने नावे पेपरला देऊन त्यांचा नवीन प्रवेश दाखवून आम्ही किती बुद्धिवान आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न गुरुमाऊली मंडळाच्या नेत्यांनी केला, त्यांच्या बुद्धीची कीव येते. शिक्षक संघाचे मंडळाचे नेते मा.दत्तात्रय राळेभात साहेब यांच्या काळापासून जामखेडची ओळख सदिच्छा मंडळाचा बालेकिल्ला आहे व राहील. सदिच्छाची ताकद निवडणुकीतून सर्वांना दाखवून देऊ असा विश्वास बोलताना मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री.नारायण राऊत सर यांनी सर्वांना दिला.

या वेळी बाळासाहेब मोरे, निलेश बोराडे, ज्ञानेश्वर कोळेकर, अर्चना भोसले मॅडम, रजनीकांत साखरे, अविनाश नवसरे, सिंधु अंधारे, मल्हारी पारखे, संतोष भोंडवे, नितीन मोहळकर, राजेंद्र त्रींबके यांनी देखील आम्ही सदिच्छाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहोत असे सांगून उमेदवारी नाही मिळाली तरी देखील सदिच्छा सोबत राहून उमेदवारी मिळालेल्या सभासदाच्या खंबीरपणे पाठीशी राहु असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर कोळेकर व केशव कोल्हे यांनी केले. शेवटी आभार राजेंद्र जरे यांनी मानले.

चौकट

विरोधकांनी जे खिंडर पडले आहे अशा वावड्या उठवल्या आहेत त्यांनी आधी आपली घरे संभाळावीत मग सदिच्छाची उठाठेव करावी. जामखेड तालुका हा सदिच्छाचा बालेकिल्ला आहे आणि तो रहाणारच. सदिच्छाला खिंडर पडले नसुन विरोधकांनी सभासदावर दबाव टाकुन प्रवेश घेतले आहेत. या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवुन देऊ.

(नारायण राऊत – जिल्हा अध्यक्ष सदिच्छा मंडळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here