जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयुर (अर्थव) महादेव हजारे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने कर्जत येथे शिकत आसलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महादेव ( मिनेश) हजारे हे तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असुन ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) हजारे हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता काल दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला यात मयुर यास ६० % गुण मिळाले यामुळे त्यास नैराश्य आले व घरात कोणी नसताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. आज देवदैठण येथे सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here