दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम ! खर्डा येथे केला शुभविवाह, फुलविणार संसार

जामखेड प्रतिनिधी

जिवन एक संघर्ष आहे, परंतु जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर मार्ग सापडतो. दोन अपंगांच्या जिद्दीची कहाणी, एक मतिमंद वर तर अपंग वधू असुन सुधा त्यानी लग्न बंधनात अडकन्याचा निर्णय घेतला .व सदर विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या उभयतांच्या जिद्दीला सर्वत्र सलाम मिळत आहे तर त्यांचे कौतुक देखील केलं जात आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील राजू भोसले या शेतकरी कुटुंबातील सुरज भोसले (वय २८ वर्षे )या जन्मापासूनच मतिमंद मुलाचा विवाह भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची मुलगी प्रांजली या अपंग तरुणीचाशी एक आगळा वेगळा आदर्श विवाह खर्डा येथील सिताराम मठाधिपती ह.भ.प. महालिंग महाराज नगरे व ह.भ.प. वायसे महाराज यांच्या उपस्थितीत व त्यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न झाला.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील राजू भोसले या शेतकरी कुटुंबातील सुरज राजू भोसले वय 28 वर्षे या जन्मापासूनच मतिमंद होता तसेच त्याचे हात व पायाची अवस्था ही अपंग असल्याने या मुलाचा विवाह होईल की नाही अशी संभ्रमावस्था त्याच्या कुटुंबीयांना होती. या मुलाचा विवाहाचा योग जुळून आला भांडगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची मुलगी प्रांजली मुकुंद अंधारे इ. बारावी शिकलेली व एका पायाने अपंग असलेले सुंदर मुलगी तिच्याशी विवाह करण्याचा योग जुळवून आणण्याचे काम येथील घनश्याम भोसले व भांडगाव येथील सचिन अंधारे या तरुणांनी सामाजिक भान राखत दोन्ही कुटुंबीयांना विषयी असणारे आस्था या सर्व घडामोडीत त्यांनी मोलाचे प्रयत्न करून या दोन्ही अपंगाचा विवाह जुळविला.


सुरज भोसले हा मतिमंद व अपंग असला तरी तो स्वतःच्या पेविंग ब्लॉगच्या कारखान्यात आपल्या वडिलांना कामात मदत करून आई-वडिलांना मदतीचा हात आजही देत आहे. तसे पाहिले तर समाजात आज मुलांच्या लग्नाचा विवाह जुळण्याचे प्रमाण कमी होत चालले असून त्यामुळे विवाहाचा गुंता वाढताना दिसत आहे अनेक तरुणांनी चाळीशी गाठली आहे परंतु सध्याच्या काळात अजूनही असंख्य तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहे परंतु या दोन्ही अपंगाचे दोनाचे चार हात झाल्याने दोन्ही कुटुंब आनंदात असून खर्डा शहरात एक आदर्श विवाह झाल्याने सर्वजण याचेच कौतुक करीत आहेत.

चौकट

देवाने प्रत्येकाला जन्म दिला आहे. जगण्याचा अधिकार दिला आहे. आज समाजामध्ये असे असंख्य अपंग आहेत. त्यांच्या जीवनात आनंद कसा निर्मान होईल त्यांचा संसार कसा फुलेल असा प्रयत्न विविध सामजिक संघटनेनी करावा.असे मत सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांनी व्यक्त केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here