जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहर गेल्या अडीच वर्षांपासून विकास कामांमुळे बदलत आहे. या बदलत्या शहराबरोबरच चांगली आरोग्य सेवा देखील आसली पाहिजे त्यामुळेच जामखेड शहरात जीवन साई हॉस्पिटल सारखे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू झाले हे कैतुकास्पद आहे. अशा हॉस्पिटल ची संख्या वाढली तर जामखेड शहर मेडिकल हब होण्यास वेळ लागणार नाही असे मत आ. रोहित पवार यांनी जीवन साई हॉस्पिटल च्या सदिच्छा भेटी दरम्यान केले.

दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी तसेच गरजु व गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने जामखेड येथे नुकतेच शहरातील बस स्थानक शेजारी महाराष्ट्र बँक रोड जवळ काही दिवसापुर्वीच जीवन साई हॉस्पिटल चे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले होते. या हॉस्पिटलला नुकतीच कर्जत जामखेड चे आ. रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली या वेळी ते बोलत होते.

या वेळी जीवन साई हॉस्पिटल चे संचालक डॉ सादेख पठाण, डॉ भरत देवकर, बालरोग तज्ज्ञ डॉ सुहास सुर्यवंशी, लॅब टेक्निशियन गोकुळ कोल्हे, ओमाशे बापु, उमर कुरेशी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की या जीवन साई हॉस्पिटल ची मी पहाणी केली सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्‍ध आसल्याने रुग्णांना आता बाहेरगावी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच दोन तज्ञ डॉक्टर व नगर येथील प्रायव्हेट हॉस्पिटल चे डॉक्टर या हॉस्पिटलला अॉपरेशन च्या माध्यमातून उपचार करणार आहेत. जामखेड शहरात अशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ची संख्या वाढली तर जामखेड शहर मेडिकल हब झाल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो. या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या शिबीरांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार होणार आहेत त्यामुळे रुग्णांची आर्थिक बचत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here