जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेने व्यवसाईक गाळ्याच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ॲड. डॉ. अरूण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. की किरकोळ फळ विक्रेते हे जामखेड शहरातील रहिवाशी असून गेली अनेक वर्षापासून फळे विकून स्वतःची व कुटुंबाची उपजीविका भागवत आहे. नगरपरिषद हद्दीतील जागेवर फळांचा गाडा लावून शासकीय नियमाप्रमाणे कर आदा करून फळ विक्री करत आहेत. परंतु आता त्या जागेवरती नगरपरिषद शॉपिंग सेंटरचे बांधकाम करणार आहे. त्या फळ विक्रेत्यांना त्या जागेवरून तुमचे दुकान काढा असे सांगण्यात आले आहे. परंतु त्याना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. पर्यायी जागा दिल्यास फळ विक्रेते त्या जाग्यावर जाण्यास तयार आहेत,आपणच ती जागा दाखवून द्यावी . त्या ठिकाणी सगळे फळाचे गाडी लावून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतील अशी भूमिका त्यांनी मांडली. बापुसाहेब ओहोळ यांनी बोलताना सांगितले की हे फळ विक्रेते गरीब आहेत इमानदार आहेत. कधी त्यांनी नगरपरिषदेची जागा बळकावण्याचे काम केले नाही. त्यांना फळ विक्रीसाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी भूमिका मांडली.
यावेळी मा. सुरेश जाधव, (मा सरपंच) मा. अजिनाथ शिंदे (शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जामखेड), द्वारकाताई पवार, जमीर बागवान, आय्यास बागवान, सोहेल बागवान, फिरोज बागवान, सुनील शिंदे, हुसेन बागवान, असलम बागवान, याकूब बागवान, वजीर बागवान, अजहर बागवान, वसीम बागवान, सचिन साळवे, अनिस बागवान, इरफान बागवान, समीर बागवान, सुरेश पवार, सचिन पवार, गौतम भाकरे, व सर्व फळ विक्रेते व इतर व्यवसायिक दुकानदार उपस्थित होते.






